Police have appealed to the devotees to come for the visit of Saundati Yallamma Devi from a security point of view 
कोल्हापूर

सौंदत्ती यल्लम्माच्या भक्तांसाठी 'या' आहेत सूचना...

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - सौंदत्ती यल्लम्मा देवीच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या भक्‍तांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी आवाहन केले आहे. यात्रेसाठी अनेक राज्यांतून भाविक मोठ्या संख्येने यल्लम्मा डोंगरावर येत असतात. त्यामुळे डोंगरावर मोठी गर्दी होत असून अनेकवेळा लहान-मोठे अपघात होत आहे. त्याचबरोबर वाहतुकीची कोंडीही होत आहे. त्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या वाहनांतून येणाऱ्या भाविकांसाठी पोलिसांनी विविध सूचना केल्या आहेत. 

यात्रेकरुंसाठी सूचना

  •  यात्रेला ट्रॅक्‍टरच्या दोन ट्रॉली घेऊन येण्यास बंदी
  •  भक्‍तांनी अंगावर दागिने परिधान करणे टाळावे. 
  •  मोठी वाहने दूर ठेवून लहान वाहनाद्वारे जोगनभावीवर यावे. 
  •  डोंगरावर मद्यविक्री, जुगार आणि मांस सेवनास पूर्ण निर्बंध. 
  •  लहान मुले व वयोवृध्द सोबत असल्यास काळजी घ्यावी.
  • मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर कारणावरुन वाहने उभी करु नयेत.

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. यात्रेनिमित्त डोंगरावर भाविकांची गर्दी होत आहे. तसेच लहान-मोठ्या अपघातांच्या घटनाही घडत असून चोरट्यांपासून दागिने जपून ठेवण्यासाठी अंगावर दागिने परिधान करू नयेत. भक्‍तांनी पोलिसांना सहकार्य करावे.
-शंकरगौडा पाटील, पोलिस उपअधीक्षक, रामदुर्ग
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

M Phil Professors : १४२१ प्राध्यापकांना मिळाला दिलासा! एम. फिल धारक प्राध्यापकांना अखेर नेट/सेटमधून सूट

Latest Maharashtra News Live Updates: किमान शिक्षकांवर तरी अशी वेळ येऊ नये, हे सरकार विसरतंय का? - विजय वडेट्टीवार

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Pune News : तीन वर्षात टाकली केवळ ९ किलोमीटरचीच सांडपाणी वाहिनी; प्रशासनाने टोचले ठेकेदाराचे कान

Monsoon Session: तुकडेबंदी कायदा रद्द! पुढे कशी असेल कार्यप्रणाली? 'त्या' जमिनींना नियमातून वगळले

SCROLL FOR NEXT