कोल्हापूर

'खाकी'तली माणुसकी; बेशुद्ध फिरस्त्याचा वाचवला जीव

सांगली फाटा येथील घटना; कोल्हापूर पोलिसांचा पुढाकार

राजेश मोरे

कोल्हापूर : ‘मिशन संवेदना’ (mission sanvedana) संकल्पने अंतर्गत जिल्हा पोलिस (kolhapur police force) दल कर्तव्याबरोबर वंचित व गरजूंना मदतीसाठी धावून जात आहेत. आज सांगली फाटा येथे बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या फिरस्त्याला पोलिसांनी वेळेत उपचारासाठी पाठवून त्याचे प्राण वाचविले.

अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे हे आज सकाळी सांगली फाटा येथील नाकाबंदीची पहाणी करण्यासाठी गेले होते. त्यांना येथे एकच पोलिस अमंलदार असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी येथील उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांकडे याबाबत चौकशी केली. त्यावेळी त्यांनी जवळच एक फिरस्ता बेशुद्ध अवस्थेत पडला आहे. त्याच्या मदतीसाठी सहकारी गेले असल्याचे सांगितले. त्याठिकाणी काकडे यांनी धाव घेतली. त्यावेळी येथील वाहतूक पोलिस कर्मचारी सुरेश कांबळे व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी रुग्णवाहिका बोलवून घेतली होती. त्यातून त्यांनी संबधित फिरस्त्याला रुग्णालयात पाठवले.

कसबा बावडा सेवा रुग्णालयात त्याला वेळेत उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पोलिसांच्या या कार्याचे कौतुक केले. पोलिसांनी डोंगराळ भागातील वाडीवस्‍ती, परप्रांतिय मजूर, वारांगणा, तृतीयपंथी यांना मदतीचा हात दिला जात आहे. शनिवारी शहर वाहतूक शाखेने तृतीयपंथीयांना धान्य वाटप केले. शहर वाहतूक शाखेच्‍या निरीक्षक स्‍नेहा गिरी यांनी पुढाकार घेवून वाटपासाठी धान्‍य व भाजीची उपलब्‍धता केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT