police officer for traffic in shahuwadi to pushish passenger in kolahpur 
कोल्हापूर

सावधान! शाहुवाडीत पर्यटनासाठी येताय का ? मग जरा जपूनच

अमर पाटील

बांबवडे (कोल्हापूर) : सावधान शाहुवाडी पर्यटनासाठी येताय? तर तुम्हाला खिंडीत आडवले जाऊ शकते, ही भिती लोकांच्यात आहे. याचे कारण आहे ते म्हणजे पोलिस. कधी महामार्ग पोलिस तर कधी स्थानिक पोलिस किंवा होमगार्ड प्रवाशांना गाडीच्या पासिंगवरुन आडवतात. नेमके  बाहेरील पासिंग हेरून गाडीचे कागदपत्रे मागतात. मग कागदपत्रे नसले की, पावत्या आणि दंड आकारले जातात. या भागातील भाडळे, जुळेवाडी, गोगवे ठिकाणच्या पोलिस पर्यटकांची खिंड रोखतात.
   
शाहुवाडी तालुक्यात भाडळे, गोगवे, मलकापूर, करंजोशी अशा गावा बाहेरील रस्त्यावर आणि खिंडीत थांबून पोलिसांची कारवाई सुरु आहे. भाडळे खिंड ही शाहुवाडी, पन्हाळा तालुक्यांची सीमेवर आहे. याठिकाणी महामार्गावर पोलिस असतात. शाहुवाडी तालुक्यामध्ये विशाळगड, आंबा, पावनखिंड, उदगीरी, जुगाई, धोपेश्वर अशी ऐतिहासिक, नैसर्गिक, धार्मिक पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन लोकं पर्यटनासाठी येत असतात. अशा गळचेपी कारवाईमुळे पर्यटक कमी होत असुन काही लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परंतु पोलिसांना विचारणार कोण? हा प्रश्न लोकांना पडत आहे. 

"महामार्गावर नियमबाह्य वाहनांच्या पावत्या करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत."

- श्रिकांत शिंदे, महामार्ग पोलीस शिपाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत पीएम मोदींच्या कार्यक्रमापूर्वी सुरक्षेत मोठी त्रुटी! बंदूकधारी अन् बनावट PMO अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नावही माहिती नसलेल्या खेळांचे बोगस प्रमाणपत्र! वर्ग १ आणि वर्ग २च्या नोकऱ्या मिळवल्या; दोघे अटकेत, एक हजार सर्टिफिकेट वाटल्याचा दावा

Duleep Trophy: शमी-मुकेशच्या माऱ्यासमोर दक्षिण विभागाची दाणादाण; पण पडिक्कल पाठोपाठ तिलक वर्माची झुंज, ठोकली तिसरी फिफ्टी

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

VIDEO: फार्महाऊसवर बिबट्याची एन्ट्री, मनसेच्या नेत्याचा पाळीव कुत्रा 'रॉकी'ची थरारक झुंज; घटना CCTVत कैद

SCROLL FOR NEXT