Police prevented Chhatrapati Sambhaji Raje 
कोल्हापूर

पोलिसांनी छत्रपती संभाजीराजेंनाच रोखले गेटवर अन्....

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - विधीमंडळ अधिवेशनात मंत्र्यांच्या भेटीसाठी आलेले खासदार छत्रपती संभाजीराजेंना गुरुवारी विधानभवनाच्या दारातच आज रोखले गेले. यावेळी आपण खासदार असल्याचे सांगूनही सुरक्षा व्यवस्थेतील पोलिसांनी त्यांच्यासोबत त्यांच्या सहकाऱ्याला आत सोडण्यास नकार देत प्रवेश पासची मागणी केली. या प्रकारावर नाराजी व्यक्त करण्याऐवजी खासदार संभाजीराजेंनी विधीमंडळ सुरक्षा व्यवस्थेचे तोंड भरून कौतुक केले आणि पासची शिस्त सगळ्यांनीच पाळावी, असे आवाहन त्यांनी केले. दिल्लीतील संसदेपेक्षा मुंबईत चोख बंदोबस्त आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले.कामानिमित्त खासदार संभाजीराजे आणि त्यांचा एक सहकारी गुरुवारी दुपारी पाऊणच्या सुमारास विधान भवनाच्या आवारात आले. तेव्हा गेटवर त्यांच्याकडे पासची मागणी झाली. त्यामुळे संभाजीराजेंची अडचण झाली. मात्र, तुम्ही खासदार असल्याने तुम्हाला एकट्यालाच सोडू, अशी भूमिका सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घेतली.

खासदार संभाजीराजेंनी सुरक्षा व्यवस्थेलाच दिले प्रशस्तिपत्रक

विधीमंडळातील कामकाजासाठी माहिती असलेली व्यक्ती घेऊ जावे लागणार असल्याचे खासदारांनी पोलिसांना सांगितले. पण पासशिवाय त्या व्यक्तीला न सोडण्याच्या भूमिकेवर पोलिस ठाम राहिले. शेवटी संभाजीराजेंच्या सहकायासाठी पासची सोय झाली आणि ते विधानभवनात आले. या प्रकारानंतर येथील सुरक्षा व्यवस्था चांगली असल्याचे प्रशस्तिपत्रक खासदार संभाजीराजेंनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT