police recruitment practice on the road 
कोल्हापूर

ना मैदान, ना जिम..., सैन्य, पोलिस भरतीचा रस्त्यावर सराव 

अमर पाटील

बांबवडे :  कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. परंतु ग्रामीण भागातील तरूणांच्या मनातील देशसेवेची भावना त्यांना स्वस्थ बसू देत नाही. म्हणून कणखर बलदंड करण्यास कोणतीही साधने नसताना प्रतिकूल परिस्थितीत करतात कष्ट म्हणून असे घडलेले जवान समोर दिसताच शत्रूचा थरकाप होतो. 

सोनवडे (ता. शाहुवाडी) येथील दहा ते पंधरा युवक सैन्य व पोलिस भरतीसाठी प्रयत्न करत आहे. त्यातच कोरोनाचा संसर्ग आल्याने भरतीच्या तारखा अजूनही नक्की नाहीत. कदाचित भरती होणार की नाही हा देखील प्रश्‍न समोर आहे. तरी देखील हताश न होता या युवकांनी सराव करण्याचे टाळलेले नाही. या युवकांना सरावासाठी मैदान नाही, की जिमसाठी पैसे भरावे लागतात, मात्र ही जिम कोरोनामुळे बंद आहे. 
कोरोनाची भिती न बाळगता सोशल डिस्टंस ठेऊन या युवकांनी सराव सुरूच ठेवला आहे. सकाळी पाच किलोमीटर धावणे, संध्याकाळी पाच किलोमीटर धावणे, झाडांच्या फांद्याना पुल-अप्स मारणे व त्यानंतर वेगवेगळ्या व्यायामाद्वारे हा सराव अखंडित चालूच आहे. 

ग्रामीण भागात अशी अनेक खेडी आहेत, जिथे असे तरुण देशेवेसाठी ध्येयवेडी झाली आहे. त्यांना धावण्यासाठी सुसज्ज मैदान लागत नाही की जिमची आवश्‍यकता नाही. उघड्या माळावर, रस्त्यावर, मिळेत्या साधनांचा वापर करुन व्यायाम करतात. सैन्यात भरती ही होतात म्हणून अशा तरुणांच्या खांद्यावर देशाची सुरक्षा अभेद्य आहे. या तरुणांची शासनाकडुन कोणतीही अपेक्षा नाही की तक्रार नाही. पालकांचे कष्ट डोळ्यासमोर ठेऊन आपल स्वप्न पूर्ण करणे हेच माफक उद्दिष्ट आहे. 

आम्हाला जवळपास कुठेही मैदान नाही. जिमला पैसे भरावे लागतात ती सध्या कोरोनामुळे बंद आहे. आम्ही कही मित्र रोज एकत्र जमून पाच किलोमिटर 18 ते 19 मिनिटांत धवतो व्यायाम करतो असे सकाळ, संध्याकाळ दोन वेळा सराव नित्यक्रमाने करतो. आम्हा सर्वांना लष्करात भरती व्हायच आहे. 
- ओंकार पाटील, सोनवडे, 


दृष्टिक्षेप 
- सोनवडेतील 10-15 युवक झटताहेत 
- अद्याप सैन्य भरतीची तारीख निश्‍चित नाही 
- सोशल डिस्टन्स ठेवून रस्त्यावर, माळावर सराव 
कोल्हापूर

कोल्हापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत पीएम मोदींच्या कार्यक्रमापूर्वी सुरक्षेत मोठी त्रुटी! बंदूकधारी अन् बनावट PMO अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नावही माहिती नसलेल्या खेळांचे बोगस प्रमाणपत्र! वर्ग १ आणि वर्ग २च्या नोकऱ्या मिळवल्या; दोघे अटकेत, एक हजार सर्टिफिकेट वाटल्याचा दावा

Duleep Trophy: शमी-मुकेशच्या माऱ्यासमोर दक्षिण विभागाची दाणादाण; पण पडिक्कल पाठोपाठ तिलक वर्माची झुंज, ठोकली तिसरी फिफ्टी

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

VIDEO: फार्महाऊसवर बिबट्याची एन्ट्री, मनसेच्या नेत्याचा पाळीव कुत्रा 'रॉकी'ची थरारक झुंज; घटना CCTVत कैद

SCROLL FOR NEXT