police recruitment  
कोल्हापूर

Police Recruitment : पोलिस भरतीला आजपासून प्रारंभ

पोलिस मुख्यालय मैदानावर चालणार प्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यातील पोलिस भरतीला उद्या (ता. ३) पासून सुरुवात होत आहे. पहिल्या टप्प्यात ८०० उमेदवार आहेत. तीन ते सहा जानेवारीदरम्यान भरती प्रक्रिया चालणार आहे. सर्व प्रक्रिया पोलिस मुख्यालयातील मैदानावर होणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आज दिली.

जिल्ह्यातील २४ पोलिस शिपाई पदाच्या जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. यासाठी ३ हजार २१६ उमेदवार पात्र ठरले आहेत. आठशे उमेदवारांचा एक टप्पा अशा पद्धतीने प्रक्रिया राबविली जाणार आहे. उद्या पहिल्या टप्प्यात पहाटे पाच वाजता मुख्यालयात ही प्रक्रिया सुरू होईल.

विशेष म्हणजे या भरतीत बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी नोंदविली जाणार आहे. सर्व प्रक्रिया मुख्यालयातील बंदिस्त मैदानावर होणार आहे. १००, १६०० मीटर धावणे, गोळाफेक यांची चाचणी होणार आहे. छाती, उंची मोजली जाणार आहे.

एकाच वेळी दोन ठिकाणी ही प्रक्रिया सुरू राहणार असल्यामुळे दुपारपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्‍वासही अधीक्षक बलकवडे यांनी व्यक्त केला आहे. पहिल्या तीन टप्प्यात सर्व पुरुष उमेदवार असतील. तर पुढील टप्प्यात महिला आणि माजी सैनिक यांची प्रक्रिया होणार आहे.

प्रत्येक चाचणीवेळी संबंधित उमेदवारांच्या गुणांची, नोंदी केलेल्या मुद्यांची माहिती तेथेच जाहीर केली जाणार असल्याचेही बलकवडे यांनी सांगितले. प्रक्रियेसाठी पोलिसांचा बंदोबस्त आणि सुरक्षेसाठी, पारदर्शकतेसाठी आवश्‍यक ती खबरदारी घेतली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: विराट कोहली ODI मालिकेसाठी भारतात पोहचला, विमानतळावरील Video Viral; जाणून घ्या सामन्यांचे वेळापत्रक

Pune Ganpati Visarjan : आवाजाची मर्यादा ओलांडल्यास ढोल-ताशा पथकांवर होणार कारवाई; १२० ठिकाणी ध्वनिपातळीचे सातत्याने निरीक्षण

IND A vs AUS A: मुंबईच्या 'त्रिमूर्ती'समोर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी गडगडली! भारताला मिळाली १६३ धावांची आघाडी

Koyna Earthquake : कोयना परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले, पण नोंद झालीच नाही! नेमके काय घडलेय कोयना मापन केंद्रात? एकाच रात्रीत भूकंपाचे पाच धक्के

Marathi News Live Updates : आदित्य ठाकरेंकडून कायदेशीर नोटिसीला उत्तर, सतीश सालियन यांचे आरोप फेटाळले

SCROLL FOR NEXT