police superintendent abhinav deshmukh took action against five people at the same time
police superintendent abhinav deshmukh took action against five people at the same time 
कोल्हापूर

पोलिस दल हादरले : एकाचवेळी पाचजणांवर या अधीक्षकांनी केली कारवाई

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :  जिल्हा पोलिस दलातील कामात कुचराई, बेशिस्तपणा, गैरवर्तन, निष्काळजीपणासह नियमांचा भंग करणाऱ्या एकूण पाच पोलिसांवर आज कारवाई करण्यात आली. यातील तिघा पोलिसांना बडतर्फ केले. त्यामुळे त्यांची आता वर्दीच उतरली आहे. एका महिला पोलिसला सक्तीने सेवानिवृत्ती आणि एकावर खात्यातून कमी करण्याची कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केली. एकाचवेळी पाच जणांवर झालेल्या कारवाईने जिल्ह्यातील पोलिस दल हादरून गेले. 


पोलिस नाईक - अमित दिलीप सुळगावकर, नारायण पांडुरंग गावडे, महादेव पांडुरंग रेपे या तिघांना बडतर्फ तर समीना दिलावर मुल्ला सक्तीने सेवानिवृत्त तर व पोलिस नाईक संतोष हरी पाटील यांना खात्यातून कमी करण्यात आले. 


जुना राजवाडा ठाण्यातून पोलिस नाईक सुळगावर यांची सध्या पोलिस मुख्यालयात नेमणूक होती. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात असताना त्यांच्याकडे एका महिलेने एक व्यक्ती त्रास देत असल्याचा तक्रार अर्ज दिला होता. त्यांनी तो अर्ज वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिला नाही. तो स्वःतजवळ ठेवत संबधित संशयिताबरोबर संपर्क केला, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. गांधीनगर पोलिस ठाण्यात तत्कालिन कर्तव्य बजावणारे पोलिस नाईक नारायण गावडे, महादेव रेपे या दोघांचे बेटींग बुकीशी लागेबंधे असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानुसार त्यांची विभागीय चौकशी करण्यात आली. त्यात ते दोषी आढळल्याने तिघांना बडतर्फ करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी दिले. 


दरम्यान, राजारामपुरी ठाण्यातील समिना मुल्ला यांची ८ डिसेंबर २०१७ मुख्यालयात बदली झाली. त्यांनी वैद्यकीय रजेवर असल्याचे कळविले; पण त्यांनी प्रमाणपत्र सादर केले नाही. मुख्यालयात त्या निवडणूक काळासह इतवेळीही हजर राहिल्या नाहीत. सांगली जिल्हा पोलिस दलात कार्यरत असणारे पोलिस नाईक संतोष पाटील सध्या कागल येथे नेमणुकीस होते. ते, सांगलीतून परवानगी न घेता जयसिंगपुरात आले. त्यांचे सहकाऱ्यांशी सलोख्याचे संबध नव्हते, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. विभागीय चौकशी अंती ते दोषी आढळले. त्यामुळे या दोघांवर सक्तीने सेवानिवृत्ती व खात्यातून कमी करण्याची कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांच्याकडून सांगण्यात आले.


संपादन - अर्चना बनगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

IPL 2024 RR vs KKR Live Score: तब्बल तीन तासांच्या विलंबानंतर राजस्थान-कोलकाता संघात 7-7 ओव्हरचा सामना; श्रेयस अय्यरने जिंकला टॉस

SCROLL FOR NEXT