Policepatil Will Keep Looking At The Situation In The Village Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

पोलिस पाटील ठेवणार गावातील परिस्थितीवर लक्ष

सकाळवृत्तसेवा

चंदगड : कोरोनाला गाव पातळीवर अटकाव करण्यासाठी आता पोलिस पाटलांवर जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून त्यांना मार्गदर्शक सुचना करण्यात आल्या आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलिस निरीक्षकांकरवी बजावण्यात आले आहेत. पोलिस निरीक्षक सुनील पाटील व हावलदार दिलीप यसादे यांनी ही माहिती दिली. 

गावातील सर्व धार्मिक सण, लग्नसमारंभ व ज्यामुळे गर्दी जमा होईल, असा कोणताही कार्यक्रम करण्यास अटकाव करण्यात आला आहे. शाळा, कॉलेज, मॉल्स, मोठी दुकाने, व्यायाम शाळा, उद्याने ज्यामुळे चार- पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतील अशी ठिकाणे पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत. त्याचे पालन न करणाऱ्या चालक, मालकांवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. बाहेर वास्तव्यास असलेली व्यक्ती गावात आल्यानंतर त्याची माहिती पोलिस ठाण्याला कळवण्याची सुचना पोलिस पाटलांना केली आहे.

ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने कोराना विषाणूवर कशा प्रकारे मात करायची याची सुचना करणारे मोठे फलक तयार करुन ते गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी लावावे. गर्दीच्या ठिकाणी वावर टाळा, हस्तांदोलन करु नये. आपल्या कार्यक्षेत्रातील हॉटेल, बार, परमिट रूम, लॉजवर इतर जिल्ह्यातून राहण्यास आलेल्या ग्राहकांची माहिती लॉज मालकांनी पोलीसांना कळवावी, औद्योगिक वसाहतीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या गावात कारखान्यातील कामगारांची सविस्तर माहिती संकलित करावी.

शेजारच्या राज्यातून सुट्टीवरुन कामावर हजर झालेल्या कामगारांची नावे पोलिसांना कळवावी, कोरोनाबाबत जी व्यक्ती अफवा पसरवील त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आदी सुचना करण्यात आल्या आहेत. पोलिस पाटलांनी सतर्क राहून या सुचनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT