political possibilities of change the political atmosphere in kolhapur together with mr. kore, awade and mahadik 
कोल्हापूर

कोल्हापुरच्या राजकारणाची दिशा बदलणार ; तीन नेते येणार एकत्र ?

संजय पाटील

वारणानगर (कोल्हापूर) : जिल्ह्याच्या राजकारणात एकमेकांविरोधात शड्डू ठोकलेले जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विनय कोरे, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह आमदार प्रकाश आवाडे आगामी निवडणुका एकत्र लढविणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी अनेक पक्षांना, नेत्यांना सोबत घेऊन जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा ठेवला. ताराराणी आघाडीच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिका ताब्यात ठेवली होती. गोकुळ व राजाराम साखर कारखान्यासह अनेक सहकारी संस्था, बाजार समित्यांवर पकड मिळविली. महापालिकेच्या राजकारणात डॉ. कोरेनी उडी घेतली आणि त्यांच्या एकाधिकारशाहीला आवाहन दिले.

मंत्री हसन मुश्रीफ, गृह राज्यमंत्री सतेज पाटील व डॉ. कोरे यांनी महापालिकाही ताब्यात घेतली. राजकीय वर्चस्व कायम राखत त्यांनी २०१४ नंतर जिल्ह्यातील एक खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्षपद त्याच्याकडे ठेवले. मात्र २०१९ च्या विधान परिषद निवडणुकीत महाडिक, लोकसभेला पुतणे धनंजय व विधानसभेला पुत्र अमल यांचा झालेला पराभव महाडिक गटाला धक्का देणारा ठरला.

माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी घराणेशाहीला सुरुंग लावत दोन वेळा आवाडेंना पराभूत केले. सहकारी संस्थांचा गड असतानाही काँग्रेसचे वरिष्ठही साथ देत नसल्याची खदखद आवाडे कुटुंबीयांत आहे. त्यामुळेच आवाडे यांनी भाजपला पाठिंबा दिला. २००४ मध्ये जनसुराज्य शक्तीची स्थापना करून विनय कोरे यांनी स्वतःसह तीन आमदार निवडून आणले. राष्ट्रवादीच्या कोट्यातून त्यांना अपारंपरिक ऊर्जा मंत्रिपद मिळाले. २००९ मध्ये पुन्हा आमदार झाले.

२०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे सत्यजित पाटील यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. मात्र २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी पाटील यांचा पराभव करून पुन्हा वर्चस्व सिद्ध केले. मात्र २०१९ मध्ये अशोकराव माने यांना पराभव स्वीकारावा लागला. हा पराभव कोरेंच्या जिव्हारी लागला. कोरे, महाडिक आवाडेंना स्वतःच्या सामर्थ्यावर राजकारणात यश मिळत नसल्याचे लक्षात आल्याने तिघे एकत्र आलो. तर जिल्हा ताब्यात ठेऊ शकतो. या अपेक्षेने एकत्र येण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. 

मैत्री तुटणार?

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील व आमदार विनय कोरे यांची मैत्री आहे; पण अलीकडे कोरे भाजपच्या संपर्कात गेले असले तरी मैत्री पक्की होती. मुश्रीफ, सतेज पाटील व कोरे यांचे राजकीय शत्रू महाडिक होते. आता कोरे यांनी महाडिकांशी जुळवून घेतल्यास मात्र कोरे-मुश्रीफ-सतेज पाटील यांची मैत्री कायम राहणार का?

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT