Porch In Front Of Datta Temple In Nrusinhwadi Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

नृसिंहवाडीत दत्त मंदिरासमोर साकारतेय पोर्च

जितेंद्र आणुजे

नृसिंहवाडी : येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवस्थान ट्रस्टतर्फे दत्त मंदिरासमोर दोन कोटी रुपये खर्चून देखणे पोर्च साकारत असून यामुळे दत्त मंदिराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. मंदिरासमोर ऐंशी फुटांच्या पोर्चचे बांधकाम अवघ्या सहा महिन्यांत पूर्ण होणार असल्याने भाविकांना दर्शनासाठी होणाऱ्या चेंगराचेंगरीपासून मुक्तता मिळणार आहे. 

नृसिंहवाडी दत्त मंदिर हे पश्‍चिम महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर सहा महिन्यांपासून दत्त देवस्थानचे माजी अध्यक्ष अशोक पुजारी, सचिव गोपाळ पुजारी व सर्व विश्वस्तांच्या संकल्पनेतून पोर्च साकारत आहेत. यातील पहिला भाग खालील टप्प्याचे बजेट एक कोटी दहा लाख रुपये व वरील भागाचे बजेट नव्वद लाख रुपये आहे. सध्या दक्षिण उत्तर प्लॅटफॉर्मचे बांधकाम सुरू आहे. मूळ दगडी घाटाला धक्का न लावता हे काम पूर्ण करण्याचा निर्धार विश्वस्त कमिटीतर्फे करण्यात आला आहे. दरम्यान, या नवीन प्लॅटफॉर्ममुळे यात्रेकरूंना दर्शन घेणे सुखकर होणार असून चेंगराचेंगरी टळणार आहे. 

देवस्थानचे अध्यक्ष मेघश्‍याम पुजारी, सचिव महादेव पुजारी, माजी अध्यक्ष व विद्यमान विश्‍वस्त अशोक पुजारी, गोपाळ पुजारी यांनी या कामी पुढाकार घेतला आहे. त्यांना विश्वस्त प्रा. गुंडो पुजारी, अमोल विभूते, विकास पुजारी, महेश हावळे, रामकृष्ण पुजारी आदी मंडळी सहकार्य करीत आहेत. 

घाटाला धक्का न लावता काम 
जुना प्लॅटफॉर्म 40 फूट लांब असून त्याच लांबीचे नवीन दक्षिण-उत्तर पोर्च उभारले जात आहेत. या प्लॅटफॉर्मचे वैशिष्ट्य असे आहे, की खांबाविना हे प्लॅटफार्म नवीन पद्धतीने उभारले जात आहेत. त्यामुळे या प्लॅटफॉर्मची खालची जागा आहे तशीच राहणार आहे. येथील दगडी घाट संत एकनाथ महाराजांनी सहाशे वर्षांपूर्वी बांधला. घाटाला धक्का न लावता हे प्लॅटफॉर्म साकारले जात आहेत. 

सहा महिन्यांमध्ये पूर्ण
दत्त मंदिरासमोर कृष्णा नदीच्या घाटावर दोन पोर्चचे दक्षिण-उत्तर बांधकाम येत्या सहा महिन्यांमध्ये पूर्ण होणार आहे. यामुळे मंदिराचे सौंदर्य देखण्या स्वरूपात भाविकांना पाहावयास मिळणार आहे. या ठिकाणी नवीन 40 फुटांचे दोन प्लॅटफॉर्म झाल्यामुळे दत्त जयंती व इतर गर्दीच्या वेळी होणारी भाविकांची चेंगराचेंगरी होणार नाही. विस्तृत पोर्चमुळे श्रींची पूजा अर्चना व महापूजा मनसोक्तपणे पाहण्याचा आनंद भाविकांना मिळणार आहे. 
- अशोक पुजारी, माजी अध्यक्ष, दत्त देवस्थान 
 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : भविष्यात पोलिसांसाठी चांगल्या घरांची निर्मिती करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मोहोळ पोलिस ठाण्याच्या इमारतीचे उद्घाटन

Latest Marathi News Live Update : नागपूर रेल्वे स्टेशनवर माफिया आणि कुख्यात हिस्ट्रीशीटरांचे वर्चस्व; शिवसेनेकडून गंभीर आरोप

Donald Trump: ब्रिक्स देश डॉलरविरोधी; डोनाल्ड ट्रम्प यांची टीका, आयातशुल्काची पुन्हा धमकी

'या' कारणामुळे झालेला संजीव कुमार यांचा मृत्यू; अभिनेत्याने सांगितलं कारण, म्हणाला, 'रात्री २ वाजेपर्यंत खायचे आणि हाडं...

Smart Electricity Meter: मोबाईल स्मार्ट झाले, मग वीज मीटर स्मार्ट का नको? उच्च न्यायालयाचा याचिकाकर्त्याला प्रश्‍न

SCROLL FOR NEXT