postpone Mangaon council due to corona
postpone Mangaon council due to corona 
कोल्हापूर

‘कोरोना’मुळे कोल्हापुरची माणगाव परिषद पुढे ढकलण्याचा निर्णय... 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - कोरोना विषाणूचा जगभरात फैलाव झाला असल्याच्या कारणावरून माणगाव (ता. हातकणंगले) येथे २१ व २२ मार्च रोजी होणारी परिषद पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी काल दिली. 

यंदा ‘भव्य माणगाव परिषद’

दरम्यान २१ व २२ मार्च १९२० रोजी माणगाव येथे बहिष्कृत वर्गाची पहिली परिषद झाली होती. ही परिषद छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणेने भरली होती. परिषदेचे अध्यक्षस्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भूषवले होते. या ऐतिहासिक परिषदेला शंभर वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर यंदा ‘भव्य माणगाव परिषद’ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमाच्या संयोजनाची जबाबदारी राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने स्वीकारली होती.

परिषदेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासह मान्यवरांना निमंत्रण दिले आहे. परिषदेची जय्यत तयारी करण्यात येत होती. मात्र राज्यात व देशातच निर्माण झालेल्या कोरोना विषाणूच्या संभाव्य धोक्‍याच्या पार्श्‍वभूमीवर गर्दीचे कार्यक्रम टाळण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

कोरोनाचा धोका पाहता परिषद पुढे ढकलण्याचा निर्णय

माणगाव येथील या ऐतिहासिक परिषदेस जमणारी मोठी गर्दी व कोरोनाचा संभाव्य धोका पाहता ही परिषद पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या बाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर माणगाव परिषद पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Nashik Police: पोलीस महासंचालकांनी घेतला सुरक्षा यंत्रणेचा आढावा! लोकसभा निवडणुक, पंतप्रधान सभेच्या पार्श्वभूमीवर सूचना

Yerwada Jail News : येरवडा कारागृहात कैद्यांकडून हवालदाराला बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT