The practice of force worship is still practiced today with stone walls and cauldrons 
कोल्हापूर

दगडी भिंती व कौले असलेल्या तालमीत आजही होतेय बलोपासनेची साधना

संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जुन्या कोल्हापूर शहराच्या पूर्वेच्या टोकाला राजारामपुरी आरोग्य व व्यायाम तालीम मंडळ. रेखीव गल्ल्यांची रचना असलेल्या शहराचा हा भाग. तालमीची स्थापना 1942 मध्ये झाली. शरीराला पीळदार आकार देण्याची ऊर्मी परिसरातील मुलांत बळावली. कुस्तीचे धडे गिरवण्याचे त्यांचा रोजचा परिपाठ बनला. छोट्या-मोठ्या कुस्त्यांच्या लढतीत त्यांचा बोलबाला झाला. गणेशोत्सव, शिवजयंतीसह विविध सामाजिक उपक्रम घेण्यात तालमीचे नाव झाले. व्यायामासाठी अत्याधुनिक मशिनरी तालमीत आज दाखल झाल्या आहेत. दगडी भिंती व कौले असलेली तालमीची इमारत आजही दिमाखात उभी आहे. 

जुन्या कोल्हापूर शहराची तटबंदी रविवार वेस अर्थात बिंदू चौकापर्यंत होती. त्यापुढच्या भागात हळूहळू वस्ती वाढली. शहरातील घरे दाटीवाटीची व छोट्या गल्ल्यांत होती. राजारामपुरीची रचना मात्र नियोजनबद्ध होती. स्वातंत्र्यपूर्व काळात राजारामपुरी परिसरात व्यायामाची आवड असलेले तरुण तालमीत घाम गाळू लागले. तालमीचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान चिंतामणी मूग यांना मिळाला. गणपतराव भोसले, बांदोडकर, सखाराम मोगणे हे तालमीच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण घटक ठरले. रामचंद्र चौगुले यांनी याच तालमीत कुस्तीतील डावपेच शिकण्यासाठी अंगाला पीळ दिला. श्री हनुमानाची उपासना करत एक पिढी कुस्तीत घडली. 
तालमीला लागून असलेल्या हनुमान मंदिराचा 1970 मध्ये जीर्णोद्धार झाला. बाबूराव पारखे यांनी अध्यक्ष, सदाशिव पसारे उपाध्यक्ष, रत्नाकर देसाई, सचिव, दिनकर मोगणे खजिनदार तर सूर्यकांत मांडवकर यांनी सहसचिवपदाची धुरा सांभाळली. तुकाराम मोगणे, दादोबा जितकर, बाळासाहेब कोकरे, शंकर चौगले, मारुती पाटील, वसंत मांडवकर सदस्य, तर पोपटराव जगदाळे, गणपतराव पाटगावकर, गणपतराव भोसले, किसन जितकर, दत्तात्रय भोपळे सल्लागार समितीत होते. जीर्णोद्धारानंतर मंदिरातील दर्शनासाठी भक्तांची गर्दी वाढत गेली. त्याचबरोबर तालमीत व्यायामपटूंची संख्याही वाढत गेली. शिवजयंती, रामनवमी, कृष्ण जन्माष्टमी, राजर्षी छत्रपती शाहू जयंती, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमात कधीच खंड पडला नाही. गणेशोत्सवात तालमीतर्फे कलापथकांना आमंत्रित केले जाई. सोंगी भजनांमुळे राजारामपुरीतील रस्त्यांवर गर्दीचा माहोल तयार व्हायचा. 
राजारामपुरीत लोकसंख्या वाढली. घरांच्या रचना बदलल्या. मोठ-मोठी दुकाने रोडवर थाटली गेली. तालमीत कुस्तीपटूंचे प्रमाण कमी झाले असले तरी तरुणांत व्यायामाच्या आवडीला ब्रेक लागलेला नाही. भलेही तालमीतील आखाड्यात कुस्तीचे डावपेच आता रंगत नाहीत. मात्र, अत्याधुनिक मशिनरींवर तरुण व्यायामासाठी रोज तालमीत पाऊल ठेवतात. सहा ते सात वर्षांपूर्वी अत्याधुनिक साहित्य तालमीत उपलब्ध झाले आहे. श्रद्धा व बलोपासनेचा संगम साधत विविध कार्यक्रम तालमीतर्फे घेण्यात येत आहेत. सामाजिक उपक्रमांवरही तालमीचा भर आहे. 

राजारामपुरी तालीम स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे. तालमीची जुनी छायाचित्रे होती. ती पावसात भिजल्याने खराब झाली आहेत. तालमीची इतिहास फारसा उपलब्ध नसला तरी तालमीचे यंदाचे 78 वे वर्ष आहे. जुन्या व नव्या पिढीच्या विचारधारेवर तालमीचे कार्य सुरू आहे.'' 
अशोक चौगुले, सचिव 


तालमीची कार्यकारिणी अशी 
राजारामपुरी तालमीचे अध्यक्ष म्हणून मारुती पाटील, उपाध्यक्ष रमेश बुरटे, सचिव अशोक चौगुले, खजिनदार सूर्यकांत मांडवकर, तर सदस्य म्हणून सदाशिव पसारे, विलास उबाळे, विशाल जाधव, नारायण हरणे यांच्यासह अन्य कार्यकर्ते सदस्य म्हणून काम पाहत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT