कोल्हापूर

प्रयाग चिखलीत रस्सा मंडळ जेवण टाकून पळाले

प्रतिनिधी


प्रयाग चिखली : येथील क्षेत्र प्रयाग पंचगंगा मूळ संगमावर ऐन लॉकडाऊन काळात रात्रीच्या पार्ट्या करणारे तरूण करवीर पोलिसांच्या रडारवर आहेत. सोमवारी (ता. 11) रात्री तेथे 15 ते 20 तरूण पार्टी करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर करवीर पोलिसांनी या ठिकाणी धाव घेतली, मात्र पोलिसांचा सुगावा लागल्याने रस्सा पार्टी करणारे तरूण पळून जाण्यात यशस्वी ठरले. 
दरम्यान भात, भाकरी आणि मटन, रस्स्याचे भांडे पोलिसांना घटनास्थळी मिळाले. ही घटना सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. 
अधिक माहिती अशी, क्षेत्र प्रयाग येथील घाट परिसरात अनेक दिवस आंबट शौकीन रात्रीच्या काळात ताबा घेत असतात. घाट परिसरात दारूच्या बाटल्या व शिल्लक अन्न घाटावर टाकून नदीचे तसेच घाट परिसराचे विद्रुपीकरण करण्यात येत होते. लॉकडाऊनच्या काळातही यांचा उपद्रव चालूच होता. ग्राम समितीच्या सूचनेनुसार सोमवारी पार्टी करणाऱ्या तरुणांना पकडण्यासाठी घाटाच्या दिशेने धाव घेतली मात्र पकडण्या अगोदरच पोलिस येणार असल्याची माहिती समजल्यामुळे ते पोलिसांना चकवा देऊन पळून जाण्यात यशस्वी ठरले. दरम्यान या ठिकाणी पार्टीसाठी तयार केलेल्या अन्न व भांडी मिळून आली. 
दरम्यान कायद्याचे उल्लघन करणाऱ्या तरुणांना चाप लावण्यासाठी करवीर पोलिसांच्या वतीने व्युव्हरचना आखण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT