President of Yashwant Brigade Pvt. Dr. Santosh Kolekar press conference kolhapur
President of Yashwant Brigade Pvt. Dr. Santosh Kolekar press conference kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापुरात धनगर समाजाला रस्त्यावर उतरवून तीव्र आंदोलन : प्रा. डॉ. संतोष कोळेकर यांचा इशारा

संभाजी गंडमाळे

कोल्हापूर : राज्यातील धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीतील आरक्षणाचा अध्यादेश काढून समाजाला तत्काळ न्याय द्यावा. अन्यथा समाजाला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल, अशा इशारा आज यशवंत ब्रिगेडचे अध्यक्ष प्रा. डॉ. संतोष कोळेकर यांनी दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष राणोजी पुजारी, लक्ष्मण पुजारी आदी उपस्थित होते. 


प्रा. कोळेकर म्हणाले, ""संसदेने वेळोवेळी सुधारणा केलेल्या अनुसुचित जमातीच्या यादीमध्ये समाजाचा उल्लेख आहे. कालेलकर समितीबरोबरच मुंबई राज्य पुनर्रचना कायद्यान्वयेही समाजाची अनुसुचित जमातीच्या सूचीमध्ये नोंद आहे. आवश्‍यक सर्व ठिकाणी अनुसुचित जमातीत समावेश असताना केवळ राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे "ड' आणि "र' या घोळ घातला गेला. राज्यात "धनगड' ही जमातच अस्तित्वात नाही. त्याबाबतचे अनेक पुरावे शासनाला दिले आहेत.

मात्र, तरीही गेल्या सत्तर वर्षापासून समाज अनुसुचित जमातीच्या सवलतीपासून वंचित राहिला आहे. त्यामुळे आता पुन्हा शासनाने सकारात्मक पावले नाही उचलली तर पुन्हा आंदोलनाचाच पर्याय समाजासमोर आहे.'' पत्रकार परिषदेला खानदेव पिराई, शिवाजी ओमापुजारी, भागोजी जायण्णा, धोंडिराम हराळे, प्रकाश गोरड, सीमा झोरे आदी उपस्थित होते.  

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

पैशाने भरलेली व्हॅन जप्त, निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई

Yoga Tips : मानसिक आरोग्यासाठी अन् शारिरीक तंदूरूस्तीसाठी फायदेशीर आहेत 'ही' योगासने, दररोज करा सराव

Loksabha 2024: मतदानाचा घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर? वाचा काय सांगतो लोकसभेचा इतिहास 

Latest Marathi News Live Update: भांडूपमध्ये निवडणूक भरारी पथकाची कारवाई, पैशांनी भरलेली व्हॅन जप्त

SCROLL FOR NEXT