As the pressure on the police increases  
कोल्हापूर

पोलिसांवरचा ताण वाढताच... 

राजेश मोरे

कोल्हापूर : लॉकडाउनमध्ये शिथिलता दिली तसे गुन्ह्यांचे प्रमाण वाढू लागले. कोरोनाच्या संकटात दैनंदिन कर्तव्य, बंदोबस्त, उत्सवाचे नियोजनाबरोबर गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्याच्या तणावाचे काम जिल्हा पोलिस दल सक्षमपणे बजावत आहे. 
कोरोनाचा सामना करण्यासाठी मार्चपासून लॉकडाउन लागू आहे. जिल्ह्यातील वैद्यकीय, आरोग्य विभागाबरोबर पोलिस दल रात्रंदिवस राबत आहे. प्रशासनाला मदत करण्यासापासून बंदोबस्ताची धुरा पोलिस दलाने सक्षमपणे सांभाळली. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यापासून, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणारे, विनापास प्रवेश करणाऱ्यांना रोखण्यापर्यंतचे महत्त्वपूर्ण काम पोलिस दलाने पार पाडले. 
लॉकडाउनमध्ये जस जशी शिथिलता दिली. तशी रस्त्यावरील वाहनांची, नागरिकांची वर्दळ वाढली. तसे अपघातासह गुन्ह्यांचे प्रमाणही वाढू लागले. महिन्याभरात जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. कर्तव्य बजावताना अनेकांशी पोलिसांचा संपर्क येतो. यातूचन कोरोनाचा संसर्गाचा शिरकाव पोलिस दलातही झाला. आज जिल्ह्यातील सुमारे 80 पोलिस कर्मचारी अधिकाऱ्यांना याची बाधाही झाली. त्यांच्या संपर्कात येणाऱ्या पोलिसांनाही क्वारंटाईन होण्याची वेळ येत आहे. अशा या संसर्गाच्या धोक्‍यांचा सामना करत पोलिस दल कर्तव्य बजावत आहे. 

लॉकडाउनच्या शिथिलतेनंतर मटका, जुगार अड्डे, गांजा विक्री करणाऱ्यांसह हुक्का पार्लरवर, लहान मुलाचे अपहरणकर्ते, मोटारसायकल चोरी, घरफोड्या चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्‍या आवळल्या; पण दिवसेंदिवस वाढ होत असलेल्या गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी पोलिसांना पेलावी लागते. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आला आहे. शासनाने त्यासाठी स्वतंत्र नियमावली तयार केली आहे. या नियमावलीचे पालन करून साधेपणाने उत्सव साजरा करण्यासाठी मंडळांनीच पुढाकार घेतला आहे. तरी या उत्सवाचे नियोजन व नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही पोलिसांना पेलावी लागणार आहे. याकाळात रजा सुट्यांचाही विचार न करता पोलिसांना काम करावे लागणार आहे. 

दृष्टिक्षेपात.. 
 जिल्ह्यातील पोलिस संख्या ः 3160 
 पोलिस कर्मचारी 2975 
 अधिकारी - 185 
लॉकडाउनमधील बंदोबस्तातील पोलिस - 2300 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IASने प्रोजेक्टला मंजुरीसाठी ५ टक्के लाच मागितल्याचा आरोप, निलंबनानंतर वर्षभराने पुन्हा सेवेत; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Baramati Assembly Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का..? पारंपरिक विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष...

Latest Marathi Live Update : ड्रग्स तस्करी प्रकरणी मुंबईच्या पुरवठादारासह दोघांना पोलिस कोठडी

कोणताच संघ ICCपेक्षा मोठा नाही, जय शहांनी पाकिस्तान-बांगलादेशला सुनावलं; तर टीम इंडियाला...

राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय! सात दिव्यांग शाळांतील विद्यार्थ्यांचे होणार समायोजन; दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांचे सीईओंना निर्देश..

SCROLL FOR NEXT