The price of genuine Kolhapuri jaggery is goo 
कोल्हापूर

अस्सल कोल्हापूरी गुळाला भाव चांगला

शिवाजी यादव

कोल्हापूर ः घरीघरीच्या जेवणाची रूची वाढविणाऱ्या आरोग्यदायी पौष्ठीक कोल्हापूरी गुळाचा हंगाम सुरू झाला आहे. बाजारपेठेत जवळपास 50 हजारांहून अधिक गुळ रव्यांची आवक झाली आहे. मुर्हुताचे सौदे उद्या दिवाळी पाडव्याला होत आहेत, असे आज उत्तम प्रतिच्या गुळाला सर्वाधिक भाव मिळत आहे. 
अपुऱ्या मनुष्यबळामुळे गुणवत्तापूर्ण गुळ निर्मितीला खीळ बसली, परिणामी बाजारपेठेत गुळाला जेमतेम भाव मिळाला. जिल्ह्यातील 960 गुऱ्हाळ घरांपैकी जेमतेम दिडत्ते दोनशे गुऱ्हाळ घरे सद्या सुरू आहेत. दरवर्षी 28 ते 35 लाख गुळ रव्यांची आवक होत आहे. तर गुजरातमधून कोल्हापूरी गुळाला सर्वाधिक मागणी असते. त्याप्रमाणे पुरवठा नसल्याने कोल्हापूरी गुळाच्या तुलनेत कमी दर्जाचा कर्नाटकी गुळ खरेदीकरून तो गुजरातच्या बाजारपेठेत कोल्हापूर परिसरातील गुळ पाठविला जातो. 
त्याची खरेदी सांगली, कराड, महालिंगपूर, मंड्या येथील बाजारपेठेतून खरेदी झाली तो थेट गुजरातला पाठवला गेला मात्र त्यात साखरेचे प्रमाण जास्त होते. ज्या जाणत्या ग्राहकांना गुणवत्ता पूर्ण कोल्हापूरी गुळ हवा आहे, असा ग्राहक आजही भाव चांगला देऊन अस्सल कोल्हापूरी गुळाची मागणी करतो. 
कोल्हापूरातील काही गुऱ्हाळ घर चालक अलिकडच्या काळात साखर घालूनच गुळ बनवू लागल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. त्यांच्यामुळे कोल्हापूर हा ब्रॅंन्ड बदनाम होत आहे. बहुतांश गुऱ्हाळघर चालक रसापासून शुद्ध गुळ बनवतात, त्यांना भावही चार हजारांपेक्षाही अधिक मिळाला आहे. यंदाच्या हंगामात अशा चांगल्या प्रतिच्या गुळाची अपेक्षा व्यापारी व अडत्यांकडून केली जात आहे. तर गुजरात मधूनही मागणी असल्याने यंदाच्या हंगामात चांगल्या प्रतिच्या गुळाला चांगला भाव जवळपास साडे हजार रूपये क्विंटल पर्यंत भाव मिळू शकेल, असा अंदाज आहे. 

जीआय मानांकनाचा उपयोग व्हावा 
कोल्हापूरी गुळाला भौगोलिक उपदर्शन (जीआय मानांकण) मिळाले. मात्र जीआय मानांकनानुसार गुळ बनवायचा म्हणजे गुळ निर्मितीत नेमके काय बदल करावेत याविषयी गुऱ्हाळ मालकांमध्ये अद्यापि संभ्रम आहे. त्यामुळे गेली पाच वर्षाहून अधिक काळ जीआयची फक्त चर्चा आहे. बाजार समितीने प्रशिक्षण घेतले मात्र त्याचा फारसा परिमाण झाला नाही. त्याच्याच पुढे जाऊन प्रत्यक्ष गुऱ्हाळ घरावर जाऊन तज्ञांनी प्रशिक्षण देणे, त्यासाठी बाजारा पेठेतील मागणीनुसार निर्मीती प्रक्रीयेत बदल करणे, त्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन लाभणे महत्वाचे आहे. हे काम यंदाच्या हंगामात पूर्ण क्षमतेने झाल्यास जीआय मानांकनामुळे कोल्हापूरी गुळाची गुणवत्ता अधिक वाढून भाव अधिक चांगला मिळण्यास मदत होणार आहे. 

""कोल्हापूरी वातावरणात तयार होणारा गुळ हा उत्तम प्रतिचा असतो, येथील गुळाची तुलना इतरत्र भागातील गुळाशी होऊ शकत नाही. त्यामुळे यंदाही चांगल्या प्रतिच्या गुळाला चांगलाच भाव निश्‍चित मिळेल. सद्या अनेकजन एक किलोचा गुळ काढतात त्यालाही चार हजार रूपयांच्यावर भाव मिळत आहे.'' 
निलेश पटेल गुळ व्यापारी

संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT