Prices Of Fruits And Vegetables And Soybeans Go Up In Gadhinglaj Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

गडहिंग्लजला फळभाज्या, सोयाबीनचे दर तेजीत

दीपक कुपन्नावर

गडहिंग्लज : येथील फळबाजारात सांगली जिल्ह्यातून द्राक्षांची नवी आवक सुरू झाली आहे. दोन महिन्यांपासून वाढलेली रोपांची आवक टिकून आहे. मागणीपेक्षा आवक कमी झाल्याने फळभाज्यांचे दर वधारले आहेत. सोयाबीनच्या दरातील तेजी कायम आहे. जनावरांच्या बाजारात बर्ड फ्लूच्या गैरसमजामुळे चिकनऐवजी मटणाला मागणी वाढल्याने शेळ्या-मेंढ्याचे दर वधारले आहेत. नागपूर परिसरातून येणाऱ्या संत्र्यांची आवक कमी झाली आहे. मोसंबीची आवक असली तरी चव आंबट असल्याने खरेदीला ग्राहकांची पसंती नाही. गेल्या आठ दिवसांपासून द्राक्षांची आवक सुरू झाली असल्याचे विक्रेते अमित रणदिवे यांनी सांगितले. किलोला 70 ते 80 रुपये भाव आहे. 

सोलापूर जिल्ह्यातून येणाऱ्या ऍपल बोरांची आवक कायम आहे. संत्री, मोसंबी, चिक्कू, पेरू 60 रुपये किलो आहेत. केळी 30 ते 40 रुपये डझन आहेत. स्थानिक पपईची आवक असून नगानुसार 20 ते 50 रुपयापर्यंत दर आहेत. भाजीमंडईत पालेभाज्या, कोथिंबिरीची वाढलेली आवक कायम आहे. शंभर पेंढ्यांना 300 रुपये, तर किळकोळ बाजारात एका पेंढीला 4 ते 5 रुपये असा भाव आहे.

गवार, कारली, दोडका, ढब्बू यांची आवक कमी असल्याने दर वधारले आहेत. घाऊक बाजारात दहा किलोला 300 ते 350 रुपये दर असल्याचे तालुका भाजीपाला खरेदी-विक्री संघाचे महादेव तराळ यांनी सांगितले. गाजर, मटार यांची चांगली आवक आहे. लिंबूची आवक जास्त असल्याने दर कमी आहेत. जनावरांच्या बाजारात म्हशींची आवक चांगली आहे. आज बाजार समितीत 100 हून अधिक आवक झाली होती.

बर्ड फ्लूच्या गैरसमजामुळे चिकनऐवजी मटणाला मागणी वाढल्याने शेळ्यामेंढ्यांचे दर मागणी वाढले आहेत. दीडशेहून जास्त आवक झालेल्या शेळ्या-मेंढ्यांचे 5 ते 15 हजारांपर्यंत दर आहेत. सरासरी 25 टक्के दर वाढले आहेत. टोमॅटो, कांदा, वांगी, फ्लॉवर यांच्या रोपांच्या पेंढीचा दर 20 ते 50 रुपर्यांपर्यंत आहे. सोयाबीनच्या दरात तेजी असून क्विंटलचा दर 4300 रुपये असल्याचे व्यापारी यश इंगळे यांनी सांगितले. 

मिरचीच्या बाजारात गर्दी 
मिरचीच्या किरकोळ बाजारात ग्राहकांची गर्दी वाढली वाढली आहे. ब्याडगी 200 ते 300 तर जवारी 300 ते 500 रुपयापर्यंत किलोचे दर आहेत. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

५ मिनिटाच्या रस्त्यासाठी अर्धा तास! राज ठाकरेंना अनुभवावं लागलं पुण्याचं ट्रॅफिक... रोज कोंडीत अडकणाऱ्या पुणेकरांच्या मनस्तापात भर

Car Prices: फक्त काही दिवस थांबा! गाड्या 1.5 लाखांनी स्वस्त होणार? काय आहे कारण?

Pasha Patel statement : ‘’... त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार’’; अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल अन् पाशा पटेलांचं वादग्रस्त विधान!

Ganesh Chaturthi 2025 : भाद्रपद महिना 'या' राशींसाठी घेऊन येणार मोठा ट्विस्ट, बाप्पाच्या येण्याने होणार संकटांचा विनाश

Solapur News: रहाटेवाडी-तामदर्डी पूल बांधकामासाठी कोटी ६ कोटी ५० लाख निधी मंजूर, जनतेच्या मागणीला यश

SCROLL FOR NEXT