Prithviraj Chavan vs Narendra Modi esakal
कोल्हापूर

'सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीसारख्या यंत्रणांचा भाजपकडून गैरवापर'

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापुरात पोटनिवडणुकीच्या निमित्तानं वातावरण चांगलंच तापलंय.

कोल्हापूर : कोल्हापुरात पोटनिवडणुकीच्या निमित्तानं वातावरण चांगलंच तापलंय. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुध्द भाजप (BJP) असाच काहीसा सामना रंगताना दिसतोय. दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. केंद्रातील भाजप सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरलं असून, आपलं अपयश लपविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना, राजकीय नेत्यांना खोट्या खटल्यात अडकविण्याचा उद्योग सुरूय. सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीसारख्या (ED) यंत्रणांचा गैरवापर सुरू केला असल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केलाय.

शहरातील वारे वसाहत व सिद्धार्थनगर येथील प्रचारसभेत ते बोलत होते. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ या सभांचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान, सभेत चव्हाण यांनी मोदींच्या (Narendra Modi) नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या (BJP Government) धोरणांवर सडकून टीका केली. भाजप सरकारची धोरणं देशाला आणि सर्वसामान्य जनतेला दारिद्र्याच्या खाईत ढकलत आहेत. मोदींना सरकार चालवायला जमत नाहीय, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ते पुढे म्हणाले, सरकारी विमान कंपन्या, विमानतळ, रेल्वे, सरकारी जमिनी विकायचं काम सुरूय. त्यामुळं सगळ्यांना नेहमी फसवू शकत नाही. जनता आता शहाणी झालीय. भाजपची सत्ता उधळून लावण्याची सुरुवात कोल्हापुरातून होईल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार जयंत आसगावकर, जयश्री जाधव, वसंत लिंगनूरकर यांची भाषणे झाली. निशिकांत सरनाईक, सुशील कोल्हटकर, जय पटकारे, लता कदम, शारंगधर देशमुख उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanpur Mishri Bazaar blast : कानपूरच्या मिश्री बाजारात मशिदीजवळ भीषण धमाका; दोन स्कुटरमध्ये झालेल्या स्फोटात सहा जण गंभीर जखमी

Dilip Khedkar यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला! अपहरण, मारहाण आणि पुरावे नष्ट करण्याचे गंभीर आरोप

Professor Recruitment Issue : प्राध्यापक भरतीत राज्यातील उमेदवारांसोबत दुजाभाव; भरती प्रक्रियेतील शैक्षणिक अर्हतेसाठी दिले कमी गुण

Pune: पुणे पोलिसांना लायटर आणि पिस्तूलमधील फरक कळेना? हडपसर पोलिसांकडून कोथरूड पोलिसांचा ‘खोटारडेपणा’ उघड

Mumbai: पात्र झोपडीधारकांऐवजी मृतांना घरे वाटली; झोपु योजनेतील बेदायदेशीर सदनिका वाटपाची चौकशी करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

SCROLL FOR NEXT