Prithviraj Patil Win Wrestling Kolhapur Marathi News
Prithviraj Patil Win Wrestling Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

पृथ्वीराज पाटीलची घिस्सा डावावर मात 

दीपक कुपन्नावर

गडहिंग्लज : बड्याचीवाडी (ता. गडहिंग्लज) येथे काळभैरव यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती मैदानात कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने तुल्यबळ इचलकरंजीच्या प्रशांत जगतापचा घिस्सा डावावर मात करून बाजी मारली. दुसऱ्या क्रमांकाच्या लढतीत लिंगनूर (ता. गडहिंग्लज) येथील सुधीर कुरळेने सांगलीच्या पवन देशमुखला माती चारली.

इचलकरंजीच्या श्रीमंत भोसले आणि सांगलीचा आशिफ मुल्लाणी यांची लढत बरोबरीत सोडविण्यात आली. कुस्त्या पाहण्यासाठी शौकिनांची गर्दी होती. पहिल्या क्रमांकाच्या कुस्ती रंगतदार झाली. तब्बल वीस मिनिटे चढाओढीनंतर पृथ्वीराज पाटीलने मैदान मारले. इतर कुस्त्यात सागर मोरे, अक्षय राऊत, बाळू घोडके, रोहन ढोले, शुभम राक्षे, ओंकार राक्षे, यश कांबळे, अक्षय कोरे, तेजस खांडेकर यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर विजय नोंदविला.

यावेळी महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, महापौर केसरी अमृता भोसले, सरपंच सतीश कोळेकर, शंकर कुरळे, उमेश रामजी, बापू खोत, कांता राक्षे, युवराज दळवी, दत्तात्रय सुतार, प्रसाद दड्डीकर, जनार्दन खोत, रामगोंडा पाटील, कुमार पाटील, नामदेव दळवी, संजय खोत उपस्थित होते. स्पर्धा समितीचे आप्पासाहेब म्हेत्री, पुंडलिक गायकवाड, काशिनाथ बेळगुद्री, अशोक शिंदे यांनी स्पर्धेचे नियोजन केले. संयोजक विश्‍वास खोत यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT