Private hospital bills are now subject to government rate regulations 
कोल्हापूर

खासगी रुग्णालयांचे बील आता शासकीय दरा नियमानुसार

सुनील पाटील

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी शासनाच्या नियमानुसार आणि निर्णयानुसार बिलाची आकारणी केली पाहिजे. तसेच बेड आरक्षित करावेत. त्यांना आवश्‍यक सर्व औषधांचा मागणीनुसार पुरवठा केला जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. 
कोणत्या उपचारासाठी किती आकारणी केली जाते, याचे दरफलक लावण्याच्या सूचना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिल्या. शहरातील खासगी रुग्णालयांच्या डॉक्‍टरांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शनिवारी संवाद साधला. 
जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, ""एखादे मोठे रुग्णालय कोरोना रुग्णालय करता येईल. या ठिकाणी सर्व डॉक्‍टर येऊन उपचार करतील. रुग्णांची सोय होईल. सी.पी.आर.मध्ये खाटांची क्षमता वाढविण्यात येत आहेत. या सर्व रुग्णालयांनी शासनाच्या नियमानुसार बेड आरक्षित ठेवले पाहिजेत. तसेच, शासनाने दिलेल्या सूचनेनुसार बिलांची आकारणी केली पाहिजे.'' 
आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, ""खासगी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णाला तत्काळ दाखल करून घ्यावे. रुग्णांवर उपचार होणार नसतील तर हे जिल्ह्याच्या दृष्टीने चांगले नाही. अनेक रुग्णालयांनी घरी आरोग्य सुविधा चालू केली आहे. यासोबतच हॉटेलमध्येही रुग्णसेवा देत आहेत.'' 
यावेळी सिद्धीविनायक रुग्णालयाचे डॉ. संजय देसाई, ऍस्टर आधारचे डॉ. दामले आणि डॉ. केणी, डायमंडचे डॉ. साईप्रसाद, स्वस्तिकचे डॉ. अर्जुन आडनाईक, अथायूचे डॉ. सतीश पुराणिक, डॉ. दीपक जोशी, "ऍपल'च्या गीता आवटे यांनीही सहभाग घेतला. 
खासगी रुग्णालयांसाठी शासनाने दर आकारणीबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार रुग्णांवरील उपचाराची दर आकारणी व्हावी. शासनाने दिलेल्या दर आकारणीबाबत रुग्णालयात फलक लावावेत, अशी सूचना डॉ. कलशेट्टी यांनी केली. 
रुग्णसेवा ही श्रेष्ठ सेवा आहे. प्रत्येक रुग्णालयाने त्यामध्ये योगदान द्यावे. त्यांना बाहेर घालवू नका, त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. आपल्याच माणसांना आपण मदत करायला हवी, असे आवाहन आमदार चंद्रकांत जाधव यांनी केले. 
- संपादन ः यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

SCROLL FOR NEXT