private hospital doubled Coronas patient bill kolhapur 
कोल्हापूर

खासगी रुग्णालयाने कोरोना रूग्णाचे बील दिले दुप्पट ; ऑडिटरने दिला चांगलाच दणका

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला खासगी रुग्णालयाने तब्बल अडीच लाखांचे बिल आकारले. मात्र, महापालिकेतर्फे नेमलेल्या ऑडिटरने सरकारी दराप्रमाणे हे बिल केवळ ८५ हजारांपर्यंत आणले. तब्बल एक लाख ६५ हजारांहून अधिक बिल रुग्णाकडून जादा घेतल्याची माहिती नुकताच उघडकीस आली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालये रुग्णांकडून बिलाच्या माध्यमातून अवास्तव आकारणी करीत असल्याचे आज पुन्हा एकदा अधोरेखित झाले. खुद्द महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मुख्य ऑडिटरकडील ही माहिती सायंकाळी पत्रकारांना दिली.

शहरातील खासगी रुग्णालयांत कोविड रुग्णांकडून बिलाची अवास्तव आकारणी केली जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आदेशानुसार आयुक्तांनी प्रत्येक रुग्णालयासाठी दोन ऑडिटर नियुक्त केले आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयाकडून आकारली जाणारी अवास्तव बिले रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. 

याबाबत अधिक माहिती मुख्य ऑडिटरनी दिली. त्यांनी सांगितले, की शहरातील एका नामवंत रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू होते. नुकताच रुग्णाला डिस्चार्ज दिला आहे. या वेळी रुग्णाला हॉस्पिटलने दोन लाख ५० हजार ६४० रुपयांचे बिल दिले होते. हे बिल ऑडिटरनी पाहिले, तेव्हा ते अधिक असल्याचे लक्षात आले. त्यांनी बिलाची माहिती घेतली तेव्हा रूमचे भाडे दुप्पट, ऑक्‍सिजनचे दर अधिक, डॉक्‍टर आणि परिचारिकांची व्हिजिट अशा वेगवेगळ्या माध्यमातून तब्बल एक लाख ६५ हजार रुपयांचे अवास्तव बिल दिले होते. केवळ ऑडिटर असल्यानेच बिल कमी होणे शक्‍य झाले. खासगी रुग्णालये रुग्णांकडून बिलांची अवास्तव आकारणी करीत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

रक्षाविसर्जन दुसऱ्या दिवशी करा
सध्या पंचगंगा स्मशानभूमीसह इतरत्र जागा अपुरी आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच रक्षाविसर्जन करावे, असे आवाहन आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी केले. रक्षाविसर्जन दुसऱ्या दिवशी केल्याने इतर मृतदेहांना जागा उपलब्ध होऊ शकते, त्यामुळे कोल्हापूकरांनी दुसऱ्या दिवशीच रक्षाविसर्जन करून सहकार्य करावे, असेही आवाहन डॉ. कलशेट्टी यांनी केले आहे.

 
संपादन- धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fake Cancer Medicines Racket : कॅन्सरच्या बनावट औषधांचे मोठे रॅकेट उघड; ९० हून अधिक रुग्णालयांना पुरवठ्याचा संशय

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर शिवेंद्रसिंहराजेंचा मोठा दावा; ‘तोंडाला पाने पुसणारे नव्हे, न्यायालयात टिकणारे आरक्षण देणार’

Kundan Sankhe Arrested : पालघर रिलीफ रुग्णालय राडा प्रकरण; निलंबित शिवसेना जिल्हाप्रमुखासह आठ जणांची पोलिसांसमोर शरणागती, राहुल घरतसह 22 जणांना पोलिस कोठडी

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती आगमन मिरवणुकीला सुरुवात

लालबागचा राजाचं दर्शन घ्यायचंय? जाणून घ्या पूजा आणि आरतीची वेळ, पाहा LIVE VIDEO

SCROLL FOR NEXT