This is a problem for flood victims in Kolhapur city 
कोल्हापूर

कोल्हापूर शहरातील पूरबाधितांना पाणी बिल सवलतीत ही आहे अडचण

प्रतिनिधी

कोल्हापूर,  ः पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना पाणी बिलात सवलतीच्या निर्णयाची चार दिवसांत अंमलबजावणी न झाल्यास अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा स्थायी समिती सभेत आज देण्यात आला. सभापती संदीप कवाळे यांनी व्ही.सी.द्वारे सदस्यांशी संवाद साधला. 
पाणीपट्टीत सवलत देण्याचा ठराव होऊनही अंमलबजावणी न झाल्याने सदस्य आक्रमक झाले. ज्या अधिकाऱ्याकडे फाईल प्रलंबित आहे, त्याच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला. 
अंदाजपत्रकातील 60 टक्के कामे झाली नाहीत. अंदाजपत्रकास महासभेची मंजुरी होऊन एक महिना झाला आहे. सर्व कामे प्रशासनाने मंजूर केली नाहीत, याकडे लक्ष वेधले. शहरातील 22 आरक्षणे ताब्यात आलेली आहेत. त्यातील बहुतांशी इमारतींची नासधूस होत आहे. काहींनी इमारती ताब्यात दिल्या नसल्याकडे सदस्यांनी लक्ष वेधले. 
व्यावसायिकांना पुढील तीन महिने सवलत देऊन बिलाचे पैसे टप्प्याटप्प्याने भरून घ्या, अशी सूचना शारंगधर देशमुख यांनी केली. सांगली, सातारा या शहरांतून व्यापारी शहरात फळ विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांचा माल जप्त करा. आजही व्यापारी रस्त्यावर बसून व्यवसाय करत आहेत. रस्त्यावर माल विकू देऊ नका, अशी सूचना राजाराम गायकवाड, पूजा नाईकनवरे यांनी केली. 
राजेंद्र पाटील यांना भाजी मार्केटच्याच ठिकाणी ड्यूटी कशी काय मिळते? त्यांना दोन वेळा निलंबित केले आहे, तरीही त्यांच्यात कोणताही बदल नाही. त्यांना मार्केटमधून काढून स्मशानभूमीकडे का देत नाही, अशी विचारणा झाली. 
वृक्षतोडीचा ठेका विशिष्ठ ठेकेदारासच का दिला जातो? त्याला मुदतवाढ का देता? विभागीय कार्यालयानुसार चार ठेकेदार झाडे तोडण्यासाठी नेमा, असा मुद्दा नियाज खान, विजय सूर्यवंशी यांनी उपस्थित केला. वृक्ष गणनेसाठी तेराकॉन कंपनीला 56 लाख रुपये दिले आहेत. शहरातील एकाही झाडाला मार्क केलेले नाही. याबाबत चौकशी अधिकारी नेमावा, अशी सूचना केली. 

फौजदारी का केली नाही? 
जेम्सटोन येथील ठेकेदाराने 65 कोटींचे कर्ज काढले आहे. पार्किंगवर सात कोटींचे कर्ज आहे. घरफाळा थकीत असून, मालक वापर दाखविला गेला आहे. तरीही फौजदारी कारवाई का होत नाही, अशी विचारणा भूपाल शेटे यांनी केली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

Will Planning: इच्छापत्र : प्रेमाची परंपरा ठेवून जाण्याचा मार्ग

Marathi News Live Updates : इडुक्की येथे भूस्खलनामुळे दोन जणांचा मृत्यू

Asian Games: ९ षटकार अन् शतक... Shafali Verma ने विश्वविक्रमासह मोडले ६ मोठे विक्रम; स्मृती मानधनालाही टाकलंय मागे

Input Tax Credit: ‘आयटीसी’ घेण्याची सुविधा स्मार्ट सल्ला

SCROLL FOR NEXT