The Problem Of Internet In E-Learning Kolhapur Marathi news
The Problem Of Internet In E-Learning Kolhapur Marathi news 
कोल्हापूर

ई शिक्षणात इंटरनेटची समस्या 

गणेश शिंदे

जयसिंगपूर : ऐन परीक्षांच्या हंगामात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन पुकारला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने ई-शिक्षणाच्या माध्यमातून अभ्यासिका सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. शहरातील बहुतांश शाळांनी ई-शिक्षणाचा प्रारंभ केला असला तरी याला शंभर टक्के प्रतिसाद मिळू शकला नाही. शिवाय ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत त्यांनाही इंटरनेटचा अडथळा सोसावा लागत आहे. ऑफलाईन विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे काय असा प्रश्‍न विद्यार्थी, पालकांना पडला आहे. 

जयसिंगपूर हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. शिरोळ तालुक्‍यासह सांगली जिल्ह्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील काही तालुक्‍यातून विद्यार्थी शिक्षणाच्या निमित्ताने शहरात येत होते. लॉकडाउनमुळे शाळा, महाविद्यालये बंद ठेवली आहेत. कोरोनाचे संकट आणखी किती दिवस राहील याची शाश्‍वती नसल्याने शासनाने ई-शिक्षणाला प्रोत्साहन दिले. याचा विद्यार्थ्यांना काही प्रमाणात फायदाही झाला. मात्र, ज्या पालकांकडे ऍन्ड्रॉईड मोबाईल व इंटरनेट सुविधा नाही त्यांच्या पाल्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागले आहे. 

शहराच्या काही भागात इंटरनेट सेवा सक्षमपणे मिळत नसल्याने ऍन्ड्रॉईड मोबाईल असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही म्हणावा तसा लाभ होताना दिसत नाही. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातून शिक्षण देऊन सर्वच घटकातील विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या प्रवाहात ठेवण्याचा शासनाने प्रयत्न केला आहे. यालाही चांगला प्रतिसाद मिळू शकणार असला तरी ऍन्ड्रॉईड मोबाईलवरून शिक्षणाचा प्रयत्न मात्र शंभर टक्के यशस्वी होऊ शकणारा नाही. नगरपालिकेच्या दहा शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील अनेक विद्यार्थ्यांची परिस्थिती बेताची असल्याने त्यांच्या पालकांकडे ऍन्ड्रॉईड मोबाईल असेलच याची खात्री नसते. 

22 टक्के विद्यार्थी ऑफलाईन 
शिरोळ तालुक्‍यातील सुमारे 22 टक्के विद्यार्थी ऑफलाईन आहेत. यामध्ये ऍन्ड्रॉईड मोबाईल असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही इंटरनेटच्या असुविधेचा मनस्ताप सोसावा लागत आहे. त्यामुळे ऑफलाईन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी भविष्यात प्रयत्न करावे लागतील. 

नुकसान टाळण्यासाठी ई-शिक्षण
लॉकडाउनमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने ई-शिक्षण प्रणालीचा अवलंब केला आहे. मात्र, ज्यांच्याकडे ऍन्ड्रॉईड मोबाईल नाहीत त्यांना मर्यादा येणार आहेत. मात्र, शिरोळ तालुक्‍यातील ई-शिक्षणाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. 
- दीपक कामत, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती शिरोळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

International Firefighters' Day 2024: फायर फायटर डे का साजरा केला जातो? जाणून घ्या सोप्या शब्दात महत्त्व

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

SCROLL FOR NEXT