The Problem Of Transportation Is solved, But The Problem Of Agriculture Water is Still blocked In Nesari Area Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

वाहतुकीचा प्रश्‍न मिटला, शेती पाण्याचा मात्र अडला, वाचा नेसरी परिसरातील सहा गावांचा प्रश्‍न

दिनकर पाटील

नेसरी : पावसाळ्यात सातत्याने तारेवाडी-हडलगे बंधाऱ्यावर पाणी येवून वाहतुक ठप्प होत होती. याला पर्यायी वाहतुकीसाठी नवा पूल उभारण्यात आला. परंतु, शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी आवश्‍यक असलेल्या बंधाऱ्याकडे दुर्लक्ष होवू लागले आहे. पावसाळ्यातील महापुरामुळे बंधाऱ्याचा भराव वाहून गेल्याने हा बंधारा कमकुवत झाला आहे. वेळीच दुरूस्ती नाही झाली, तर शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. 

पन्नास वर्षापूर्वी तारेवाडी-हडलगे दरम्यान घटप्रभा नदीवर शेती, पिण्याचे पाणी अडवण्यासाठी कोल्हापूरी पध्दतीचा बंधारा बांधला. 2019 आणि 2020 मध्ये झालेल्या अतिवृष्टीने हडलगे गावच्या बाजूकडील बंधाऱ्याचा भराव उखडल्याने बंधारा कुमकुवत झाला आहे. नेसरी, सावतवाडी तर्फे नेसरी, तावरेवाडी, डोणेवाडी, तारेवाडी, हडलगे आदी गावांसाठी शेती व पिण्याच्या पाण्यासाठी हा बंधारा संजीवनी ठरला आहे. पाणी साठ्यासह वाहतुकीसाठी वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

बंधारा जुना व अरूंद असल्यामुळे दोन वर्षापूर्वी शासनाने बंधाऱ्यानजीकच नवा पूल बांधला आहे. वाहतुकीचा प्रश्‍न सुटला असला, तरी पाणी अडविण्यासाठी बंधारा आवश्‍यक आहे. बंधारा कुमकुवत झाल्याने सहा गावे शेती, पाण्याच्या पाण्यासाठी अवलंबुन असल्याने वेळेतच बंधारा दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

तत्कालीन आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी बंधाऱ्याची पाहणी करून दुरूस्तीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना सुचना दिल्या होत्या. कच्चा भराव टाकून बंधारा डागडूजी झाली होती. परंतु यावर्षीच्या जोरदार पावसाने व महापुराने हा कच्चा भरावही वाहून गेला आहे. यामुळे बंधाऱ्याची कायमस्वरूपी मजबुतीकरण करण्याची मागणी होत आहे. 

धोका उत्पन्न होण्यापूर्वी दुरूस्तीची गरज
हडलगे-तारेवाडी घटप्रभा नदीवरील बंधाऱ्यात अडविले जाणारे पाणी नेसरी परिसरातील सहा-सात गावांतील शेतीबरोबरच पिण्यासाठी वापरले जाते. भराव उखडल्याने बंधारा नाजूक झाला असून भविष्यात मोठा धोका उत्पन्न होण्यापूर्वी बंधारा दुरूस्त करण्याची गरज आहे. 
- विष्णू पाटील, माजी सरपंच हडलगे 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adult Content Addiction : अडल्ट कंटेंट पाहणे दारु अन् सिगारेटच्या व्यसनापेक्षाही घातक; डॉक्टरांनी तरुणाईला दिला धोक्याचा इशारा

Trump On Modi : रशियाच्या तेलावरून पुन्हा ‘ट्रम्प बाँब’, खरेदी थांबविण्याचे पंतप्रधान मोदींकडून आश्वासन मिळाल्याचा दावा

Solapur Fraud: 'मुंबईच्या व्यापाऱ्याला बार्शीत १२ लाखांना गंडवले'; पोकलेन मशिन खरेदीतून भागीदारी व्यवसायाचे आमिष

Maharashtra Elections : चार दिवसांत साडेसहा लाख मतदार कसे वाढले? काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा निवडणूक आयोगाला सवाल

Vasubaras 2025: वसुबारसेच्या दिवशी कामधेनुची मूर्ती घरात कोणत्या दिशेला ठेवावी? वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

SCROLL FOR NEXT