N.D. Patil Death 
कोल्हापूर

ज्येष्ठ नेते एनडी पाटील यांचे निधन

सकाळ डिजिटल टीम

ज्येष्ठ नेते प्राध्यापक एनडी पाटील यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन

कोल्हापूर - ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, गेली सात दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या सामाजिक लढ्याचे नेतृत्व करणारे लढाऊ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील (N. D. Patil) (वय ९३) यांचे आज निधन झाले. प्रकृती अस्वास्थामुळे अकरा जानेवारीपासून येथील खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. कालपासून त्यांची प्रकृती गंभीर बनली. आज दुपारी बाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉ.अशोक भूपाळी यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या वर्षी वयाच्या ब्यानव्या वर्षाही त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती. दरम्यान, त्यांच्या निधनाने सर्वसामान्यांचा आवाज हरपला, अशा भावना सर्वच स्तरातून उमटल्या. (N. D. Patil Passed Away)

अॅपल सरस्वतीचे डॉक्टरांनी एनडी पाटील यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती दिली. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यावर उपाचार सुरु होता. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकाराचा त्रास होता. ११ जानेवारीला त्यांना बोलण्यात अडथळा येत होता. तेव्हा रुग्णालयात सिटी स्कॅन केल्यानंतर वैद्यकीय उपचार कऱण्याचा निर्णय घेतला. त्यांची प्रकृती ढासळत चालली होती.

एनडी पाटील यांच्यावर उपचार सुरु असताना १४ तारखेला त्यांचा रक्तदाब कमी व्हायला लागला. त्यानंतर त्यांची शुद्धही हरपायला लागली. त्यांना पुढचे वैद्यकीय उपचार न करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यांना व्हेटिलेटर किंवा डायलिसिस करण्यात आलं नाही. आज सोमवारी सकाळी ते पूर्ण बेशुद्ध झाले आणि रक्तदाब कमी झाला. त्यानंतर दुपारी १२ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सांगलीत एका सामान्य शेतकरी कुटुंबात १५ जुले रोजी एनडी पाटील यांचा जन्म झाला. पुणे विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र आणि एलएलबीचे शिक्षण घेतले. पुढे १९५४ ते १९५७ या कालावधीत त्यांना साताऱ्यात छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणूनही काम पाहिले. तसंच कमवा व शिका योजनेचे प्रमुख आणि रेक्टर म्हणून ते कार्यरत होते.

1948 मध्ये त्यांनी शेकापमध्ये प्रवेश केला. त्यानंतर १९५७ ला ते मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस म्हणूनही कार्यरत होते. तसंच १९६० ते १९८२ या कालावधीत ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. यात १९७८ ते १९८० या कालावधीत सहकारमंत्रीही होते. १९८५ ते १९९० या काळात ते कोल्हापूर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Municipal Election : "जे काकांचे झाले नाहीत, ते आसिफ शेखचे काय होणार?" ओवैसींचा अजित पवारांवर बोचरा प्रहार

Snack Tourism 2026: खवय्यांसाठी नवा ट्रेंड! 2026 मध्ये स्नॅक टुरिझमचा नवा फंडा होणार हिट, नेमका काय विषय...

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत कौटुंबिक कलहातून पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

BMC Election: महापालिकेच्या रिंगणात गुन्हेगार उमेदवार! २५ गुन्हे नावावर असलेल्या गुंडास राष्ट्रवादीची उमेदवारी

Pregnancy Job Scam : महिलांना गरोदर करा आणि कमवा 10 लाख! 'प्रेग्नंट जॉब सर्विस'च्या नावाखाली मोठा घोटाळा उघड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT