The Professional In Nesari Cherished Humanity Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

पालातील लोकांचे केले मोफत केशकर्तन, नेसरीतील व्यावसायिकाने जपली माणुसकी

दिनकर पाटील

नेसरी : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वांसमोरच अडचणी उभा राहिल्या आहेत. पण, स्वत:चा व्यवसाय अडचणीत असतानाही गरजूंना सहकार्य करणारे अवलिया समोर येत आहेत. येथील सुधाकर यादव त्यापैकीच एक. येथील दसरा चौक परिसरातील पालात राहणाऱ्या गरीब 22 नागरिकांचे त्यांनी मोफत केशकर्तन केले. यादव यांनी माणुसकीचे दर्शन घडविले. त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक होत आहे. 

यादव यांचे रविवार पेठेत न्यू गोवा हेयर कटिंग नावाचे दुकान आहे. लॉकडाउन काळात सलून बंदच होते. दोन-तीन महिने सलून बंद असल्यामुळे अनेकांसमोर केस कटिंग करण्याबाबत अडचणी निर्माण झाल्या. काहींनी घरीच सोईनुसार केशकर्तन केले. मात्र, येथील दसरा चौकात पालात राहणाऱ्या नंदी बैल, देव वाले, पारधी समाजाच्या नागरीकांची अडचण झाली. पोटासाठी गावोगावी भटकंती करणाऱ्या या नागरिकांचा उदरनिर्वाह, भटकंती बंद झाली. पोटाच्या प्रश्‍नाबरोबरच आर्थिक चणचण भासत होती. 

पालातील नागरिकांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन यादव यांनी या नागरीकांचे मोफत केशकर्तन करण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पालात जाऊन मोफत केशकर्तन केले. पालातील नागरीकांनीही समाधान व्यक्त केले. अडचणीच्या काळात यादव यांनी दाखविलेल्या या माणुसकीचे कौतुक होत आहे. 

समाधान हाच माझा मोबदला
पालात राहणाऱ्या गरीब, गरजू, भटकंती करणाऱ्या लोकांसाठी अडचणीच्या काळात उपयोगी पडल्यामुळे माझ्या कलेचे चीज झाल्याचे वाटते. त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हाच माझा मोबदला असे समजतो. पैशापेक्षा मोफत कामाचे समाधान लाख मोलाचे आहे. 
- सुधाकर अशोक यादव, नेसरी

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New ST Buses Decision : सतेज पाटलांनी मागणी करताच राज्य सरकार नवीन आठ हजार एसटी बसेसची खरेदी करणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Nagpur Street Food Price Hike : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना झटका! उद्यापासून तर्री पोहे आणि समोसा खाणे महागणार; पाहा काय आहेत नवीन दर?

Women Cricket: क्रिकेटमधील महिलांचा उत्साह दुपटीने वाढला; भारतातील १४ राज्यांचा सर्व्हे, युवा खेळाडूंची पावले सरसावली

Rural LPG Crisis News:गॅस टंचाईमुळे ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली; महिलांची अडचण वाढली; धूरमुक्त स्वयंपाकघर पुन्हा धुरकट

कसं झालेलं दादा कोंडके यांचं निधन? महाराष्ट्राच्या 'सोंगाड्या'च्या मृत्यूचं कोडं कधीच सुटलं नाही

SCROLL FOR NEXT