The professors will receive a day's pay for the fight against the Corona virus 
कोल्हापूर

प्राध्यापकांकडून कोरोना विरुद्ध लढाईसाठी एक दिवसाचे वेतन दिले जाणार...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - राज्यभरातील विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या प्राध्यापकांकडून कोरोना विषाणू विरोधातील लढाईसाठी एक दिवसाचे वेतन दिले जाणार आहे. राज्यातील प्राध्यापकांच्या महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटीज अँण्ड कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशन (एमफुक्टो) या संघटनेने हा निर्णय पत्रकाद्वारे जाहीर केला आहे.

राज्यातील करोना विषाणू बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदीसह विविध प्रतिबंधात्मक उपाय राबवण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी ‘एमफुक्टो’ या प्राध्यापकांच्या संघटनेनेही पुढाकार घेतला आहे. एमफुक्टोचे अध्यक्ष डॉ. तपती मुखोपाध्याय व सरचिटणीस डॉ. एस. पी. लवांडे यांनी या बाबतचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
राज्यातील ११ अकृषी विद्यापीठांमध्ये संघटनेचे सदस्य असलेले सुमारे ३० हजार प्राध्यापक कार्यरत आहेत. शासनाकडून प्राध्यापकांना एप्रिलमध्ये दिल्या जाणाऱ्या वेतनातून एक दिवसाचे वेतन वजा करून घेण्यात यावे, असे संघटनेच्या पत्रात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

SCROLL FOR NEXT