Proposal For By-Election Of Three Seats In Ichalkaranji Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

इचलकरंजीत तीन जागांच्या पोटनिवडणुकीच्या हालचाली

पंडित कोंडेकर

इचलकरंजी : येथील पालिकेच्या रिक्त झालेल्या तीन जागांसाठी पोट निवडणूक घेण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पालिका प्रशासनाकडून पाठवला आहे. याबाबत अद्याप कोणत्याही राजकीय हालचाली नसल्या तरी या तिन्ही जागांच्या पोट निवडणुकीबाबत शहरात उत्सुकता आहे. 

येथील प्रभाग क्रमांक 5 (अ) मधील विद्यमान नगरसेविका शोभा कांबळे यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. त्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चिन्हावर निवडून आल्या होत्या. त्यांनी बांधकाम समितीचे सभापतिपदही भूषवले आहे. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेची पोटनिवडणूक घेण्याबाबतचा प्रस्ताव पालिका प्रशासनाकडून 16 ऑक्‍टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला आहे. 

याशिवाय प्रभाग क्रमांक 18 (ब) मधील नगरसेवक संजय तेलनाडे व 31 (ब) मधील विद्यमान नगरसेवक सुनील तेलनाडे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले आहे. त्यामुळे या दोन्ही जागांचीही पोटनिवडणूक होण्याबाबतचा प्रस्ताव 14 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला आहे. मात्र या दोघांनी शासनाकडे अपील केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र याबाबतची माहिती नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नगरविकास सचिवांकडे अपिलाबाबतची माहिती मागवली आहे. मात्र त्याचे अद्याप उत्तर आले नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही जागांच्या पोट निवडणुका कधी जाहीर होणार हे अनिश्‍चित आहे. मात्र प्रभाग क्रमांक 5 (अ) ची पोट निवडणूक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Education Crisis: अर्धापूरात ८४ शिक्षक बीएलओ कामात अडकले; दोन-दोन वर्गांवर एकच शिक्षक, विद्यार्थ्यांच्या शिक्षणहक्कावर गदा

रविवार ठरणार खास! आयुष्मान योगामुळे 2 राशींची लागणार लॉटरी; जाणून घ्या तुमचं भविष्य

Why Eyes Twitch: डोळा सारखा फडकतोय ? समजू नका सामान्य; शरीरात असू शकते या घटकाची कमतरता!

मराठी अभिनेत्रीसोबत केलेलं लग्न पण घटस्फोटाने पूर्ण खचले, यतीन कार्येकर यांनी पहिल्यांदाच बोलले; मी कामात होतो तेव्हा ती...

Ambad car theft case : अंबड तालुक्यातील कार चोरीचा अवघ्या सहा तासांत उलगडा; दोन चोरटे जेरबंद, शस्त्रांसह स्विफ्ट डिझायर कार जप्त

SCROLL FOR NEXT