Proposal to the Planning Committee on behalf of "Forest" for the use of Oxygen Park 
कोल्हापूर

ऑक्‍सिजन पार्क वापरासाठी  "वन'तर्फे नियोजन समितीला प्रस्ताव 

बी. डी. चेचर

कोल्हापूर :  ऑक्‍सिजनचे महत्त्व किती आहे?, हे आता कोरोनामुळे लक्षात आले आहे. केवळ शहरातच नव्हे तर गावागावांत ऑक्‍सिजन उपवने तयार झाली पाहिजेत, असे सरकारलाही वाटू लागले आहे. या पार्श्‍वभूमीवर विविध ठिकाणी ऑक्‍सिजन पार्क उभी राहू लागली आहेत. येथील शेंडा पार्क परिसरात तीन वर्षापूर्वी वन विभागाने ऑक्‍सिजन पार्क साकारला. आता येथील सर्व झाडांची पूर्ण क्षमतेने वाढ झाली आहे. 
दरम्यान, लवकरच वन विभागाकडून कृषी विभागाकडे झाडे लावलेली सर्व जागा हस्तांतरित होणार आहे. मात्र, ऑक्‍सिजन पार्क हा कायमस्वरुपी रहावा आणि प्रत्येक नागरिकांना त्या परिसरात फिरता यावे, यासाठी वन विभागातर्फे जिल्हा नियोजन समितीला प्रस्ताव देण्यात येणार आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी, पर्यावरण अभ्यासकांसह ज्येष्ठांनी पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे. 
नियोजित प्रस्तावानुसार शेंडा पार्कातील या ऑक्‍सिजन पार्कमध्ये विविध पक्ष्यांना पाणी, पाण्याची तळी, बसण्यासाठी बाकडी, पेव्हिंग ब्लॉक, मनोरे गोष्टी समाविष्ट केल्या जाणार आहेत. या ठिकाणी एकूण झाडांची संख्या 33 हजार 336 आहे. सध्या या झाडांची उंची सुमारे पाच ते सात फुटांपर्यत आहे. सुमारे शंभर जातीची झाडे या परिसरात असल्याने येथे चांगला ऑक्‍सिजन मिळू शकतो, असे पर्यावरण तज्ञांनी सांगितले. 


ऑक्‍सिजनचे महत्त्व अधिकच आधोरखित झाल्याने आता शेंडा पार्कमधील पार्कला महत्त्व दिले पाहिजे. नियोजित प्रस्तावाच्या मंजुरीसाठी लोकप्रतिनिधी, पर्यावरण अभ्यासक व नागरिकांनी पाठबळ दिले पाहिजे. 
- संपत देसाई, वनपाल, सामाजिक वनीकरण. 

शेंडा पार्क येथील ऑक्‍सिजन पार्क जरी कृषी विभागाकडे हस्तांतर झाले तरी या विभागाने शेवटपर्यन्त टिकवण्याची जबाबदारी ही कृषी विभागाची आहे कारण झाडे लावतात आणि काही कालांतराने ती तोडली जातात. कायमस्वरुपी ऑक्‍सिजन उपवने तयार झाली पाहिजे. 
- जय सामंत, पर्यावरण अभ्यासक. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT