Protest of devendra Fadnavis by sambhaji brigade kolhapur 
कोल्हापूर

देवेंद्र फडणवीस यांना कोल्हापुरात प्रवेश बंद...

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजर्षी शाहू महाराजांचा सामाजिक कार्यकर्ता असा उल्लेख करून बदनामी केली आहे. याबद्दल श्री. फडणवीस यांचा कोल्हापूरकरांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्‍त करत आहोत. फडणवीस जोपर्यंत राजर्षी शाहू महाराज आणि जनतेची माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना कोल्हापुरात प्रवेश बंदी करत आहोत, असे पत्रक संभाजी ब्रिगेडने दिले आहे.

पत्रकात म्हटले आहे, जगातील विद्वानांच्या यादीमध्ये राजर्षी शाहू महाराजांचा उल्लेख केला जातो. लोकराजा शाहू महाराजांना पिलर ऑफ सोशल डेमोक्रसी म्हणजेच सामाजिक लोकशाहीचे स्तंभ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे श्री. फडणवीसांनी शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांचा इतिहास वाचून समजून घ्यावा, असे आवाहनही केले. सबंध देशभर ज्या राजांचा उल्लेख राजर्षी म्हणून केला जातो त्यांना सामाजिक कार्यकर्ते म्हणण्याचा कपटी दावा करणाऱ्या फडणवीस यांची विरोधी पक्षनेते पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली.

संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, भगवान कोईगडे, विकी जाधव, अभिजित कांजर, योगेश जगदाळे, उमेश जाधव यांनी पत्रक दिले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! कॅश विड्रॉवलचे नियम बदलले, ४ मोफत व्यवहारांनंतर भरावा लागणार चार्ज, पण किती?

सुरत, गुवाहाटी अन् भाजपसोबत सत्तास्थापना... शिंदे गटाच्या बंडामागे काय होतं? कपिल सिब्बलांनी सर्वोच्च न्यायालयात मांडला घटनाक्रम

Marathi News Live Updates : शिंदे मुख्यमंत्री झाले, पण त्यांनी उचललेली पावलं चुकीची - कामत

जुन्नर हादरलं! शेजारच्या तरुणानं शेतात नेलं अन् १० वर्षांच्या मुलीसोबत घाणेरडं कृत्य..| Junnar case

IND vs SL 1st Test: सामन्यात १० विकेट्स, तरी मानव सुथारला POM चा पुरस्कार नाही! कोण ठरला सर्वोत्तम खेळाडू अन् का?

SCROLL FOR NEXT