protest ichalkaranji graber issues 
कोल्हापूर

इचलकरंजीत पालिकेच्या प्रवेशव्दारात धरणे आंदोलन

पंडित कोंडेकर

इचलकरंजी - येथील आसरानगर परिसरातील कचरा डेपोतील आगीच्या प्रश्‍नाचे आज पुन्हा पालिकेत पडसाद उमटले. कचरा डेपो हटाव कृती समितीतर्फे पालिकेच्या प्रवेशव्दारात धरणे आंदोलन करण्यात आले. आठ दिवसांत कचरा डेपोतील आगीचा प्रश्‍न कायमचा मार्गी न लावल्यास तेथे कचरा टाकण्यास विरोध करण्याचा इशारा आंदोलकांना दिली. येत्या 15 दिवसांत हा प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी दिली. 

आसरानगरमधील डेपोमध्ये दररोज 120 टन कचरा टाकला जातो. तेथे कचऱ्याचे कोणतेही विलगीकरण केले जात नाही. प्लास्टीक कचऱ्याचेही मोठे प्रमाण आहे. पावसाळ्यात कचरा कुजला जातो. परिसरात दुर्गंधी पसरली जाते. तर इतर वेळा कचरा पेटून त्याचे धुराचे प्रचंड लोट परिसरात पसरतात. सुमारे दोन किलो मिटरचा परिसरात धूरांने व्यापला जातो. हा त्रास सातत्यांना परिसरातील रहिवाशी नागरिकांना होत आहे. सन 2005 पासून या परिसरातील नागरिकांनी या प्रश्‍नाबाबत पालिकेला सातत्यांने जाब विचारला आहे. पण कोणतीच ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आज कचरा डेपो हटाव कृती समितीच्यावतीने पालिकेसमोर लाक्षणीक उपोषण करण्याचा निर्णय घेतला. 

त्यानुसार आज समितीच्यावतीने पालिकेच्या प्रवेशव्दारात लाक्षणीक उपोषण करीत असंवेदनशील पालिका प्रशासनाचा धिक्कार केला. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर आंदोलकांच्या शिष्टमंडळांने नगराध्यक्षा स्वामी यांना निवेदन देवून चर्चा केली. यावेळी विविध मागण्या करण्यात आल्या. या प्रश्‍नी टप्प्याटप्प्यांने उग्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाव्दारे देण्यात आला. निवेदनावर डॉ.आरती कोळी, राजू कोरे, मुन्ना खलिफा, संकेत बागल, किरण माळी, शेखर पवार, सुधीर जोशी, सौ.सुरेखा लोहार, विशाल गोपलकर, डॉ.आनंद कोळी, जीवन कोळी, दिनेश लिमये यांच्या सह्या आहेत. 


 
कचरा डेपोवरील आग विझविण्यासाठी.... 
* 18 जानेवारीपर्यंत आवश्‍यक उपाय योजना करावी. 
* कामगारांची नियुक्ती करावी. 
* कसूर करणाऱ्या स्वच्छता निरिक्षकांवर जबाबदारी निश्‍चीत करावी. 
* कचरा डेपोबाबत श्‍वेतपत्रिका काढून ती जाहीर करावी. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Charge: UPI पेमेंटवर चार्ज लागू झाला तरी हे 6 UPI व्यवहार फ्री! एक रुपयाही चार्ज नाही; जाणून घ्या कोणते

Vaibhav Sooryavanshi : वैभवला पुन्हा संधी केव्हा मिळणार? गौतम गंभीरच्या उत्तराने सारेच गार; संजू सॅमसनचं नाव घेऊन विषयच संपवला

iPhone 18 Pro साठी पहाटेपासून ग्राहकांच्या लांब रांगा; कुठे मिळतो? किती EMI भरावा लागणार? जाणून घ्या

Andheri Accident: अंधेरीत गोखले पुलावर दोन वाहनांची धडक, एकमेकांवर आदळल्यानं कारचा चुराडा; Video Viral

Goat Farming Subsidy: शेळीपालनासाठी ६.८४ लाखांचे अनुदान; १०० शेळ्या, ५ बोकडांचा फार्म उभारण्याची संधी, कसा करायचा अर्ज?

SCROLL FOR NEXT