protest in shivaji university kolhapur
protest in shivaji university kolhapur 
कोल्हापूर

 शिवाजी विद्यापीठात 'रस्त्यावर अभ्यास' आंदोलन

संदीप खांडेकर

कोल्हापूर : बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालय व अभ्यासिका विनाविलंब सुरू करा, यासह अन्य मागण्यांसाठी ऑल इंडिया फेडरेशन व ऑल इंडिया स्टुडंटस फेडरेशनतर्फे शिवाजी विद्यापीठात 'रस्त्यावर अभ्यास' आंदोलन आज करण्यात आले. या वेळी ग्रंथालय अभ्यासिका बिनशर्त  सुरू झाल्याच पाहिजे, ग्रंथालय आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, लढेंगे जितेंगे अशा घोषणा देण्यात आल्या. 

कुलगुरू उपस्थित नसल्यामुळे प्रशासनाच्या वतीने निवेदन स्वीकारण्यासाठी विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव उपस्थित होते. 

 शासनाच्या आदेशानुसार ग्रंथालय, अभ्यासिका सुरू कराव्यात, अशी मागणी महिनाभरापूर्वी कुलगुरुंकडे केली होती. पण, प्रशासनाने विद्यापीठ आवारातील बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालय, अभ्यासिका सुरू केलेली नाही. औरंगाबाद सारख्या इतर विद्यापीठांमध्ये अभ्यासिका सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रात चित्रपटगृहे, मंदिर व हॉटेल्स सुरू आहेत. विद्यापीठातील ग्रंथालय अभ्यासिका का सुरू नाहीत, असा प्रश्न उपस्थित करत पीएच‌.डी. संशोधकांसाठी नवीन बांधलेले हॉस्टेल सुरू करण्यात यावे. जेणेकरून विद्यार्थ्यांचे संशोधनाचे काम चालू राहील, अशी मागणी करण्यात आली. राष्ट्रीय कौन्सिल सदस्य गिरीश फोंडे, प्रशांत आंबी, आशुतोष गावडे, सुरेश कोकरे, केदार तहसीलदार, आरती रेडेकर, संदेश माने, योगेश कसबे, सुनील कोळी, रजत शेख आंदोलनात सहभागी झाले होते.

राज्यात इतर विद्यापीठात जर ग्रंथालय, अभ्यासिका सुरू असतील तर महाराष्ट्रामध्ये शिवाजी विद्यापीठात ग्रंथालये, अभ्यासिका बंद का? अशी विचारणा करण्यात आली. आठ दिवसांत ग्रंथालये, अभ्यासिका सुरू करण्यात आली नाही, तर कुलगुरूंच्या केबिनमध्ये असंख्य विद्यार्थ्यांना घेऊन अभ्यासाला बसणार, असा इशारा यावेळी देण्यात आला.

 
संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT