The Protesters Tore Up A Letter From Brisk Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

"ब्रिस्क' कंपनीने दिलेले पत्र आंदोलकांनी फाडले

सकाळवृत्तसेवा

गडहिंग्लज : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांची ग्रॅच्युटी दोन महिन्याच्या अंतराने समान तीन हप्त्यात देत असल्याचे लेखी पत्र आज ब्रिस्क फॅसिलिटीज कंपनीचे जनरल मॅनेजर व्ही. एच. गुजर यांनी आज प्रांताधिकाऱ्यांना दिले. 

दरम्यान, कंपनीने केवळ ग्रॅच्युटी देण्याबाबतचे पत्र कामगारांना सुपूर्द केल्यानंतर कामगारांनी ते अमान्य केले. या पत्रावर संतप्त भावना व्यक्त करून आंदोलकांनी हे पत्र फाडून टाकले. आठ टक्के व्याजासह ग्रॅच्युटी, रजा रोखीकरण, वेतनवाढीतील फरक या संपूर्ण देणी व्याजासह मिळत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका आंदोलकांचे नेते व माजी संचालक शिवाजी खोत यांनी स्पष्ट केली. 

दोन दिवसापूर्वी प्रांताधिकारी कार्यालयात कंपनी, कारखाना व कामगार यांची संयुक्त बैठक झाली होती. त्यामध्ये देणी देण्याबाबतचे लेखी पत्र देण्याची ग्वाही कंपनीने दिली होती. आज दिलेल्या पत्रात कंपनीने म्हटले आहे की, निवृत्त कामगारांच्या देणीबाबतचा वाद उच्च न्यायालयात असून त्या निर्णयाशी अधीन राहून ग्रॅच्युएटी देण्याचा निर्णय कंपनी संचालकांनी घेतला आहे.

कंपनी कार्यकाळात 291 कामगार निवृत्त झाले असून 31 डिसेंबर 2020 अखेर त्यांची ग्रॅच्युटी 98 लाख 47 हजार इतकी होते. ही रक्कम दोन महिन्यांच्या अंतराने 5 फेब्रुवारी, 5 एप्रिल व 5 जून अशा समान तीन हप्त्यात कामगारांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात येतील. 

परंतु, सायंकाळपर्यंत पत्र कामगारांना न मिळाल्याने प्रांत कार्यालय आवाराच्या प्रवेशद्वारात बसलेल्या आंदोलकांनी तेथून उठून कार्यालयाच्या दरवाजाबाहेर ठिय्या मांडला. कामगारांच्या विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला. अखेर त्यांना पत्र मिळाले. परंतु या पत्रावर कामगारांनी नाराजी व्यक्त केली. 

उद्यापासून उग्र आंदोलन 
मुळात थकीत देणी देण्यास दहा वर्षांनी कंपनी तयार झाली आहे. त्यातही दोन महिन्याच्या अंतराचे हप्ते म्हणजे कामगारांची ही चेष्टाच आहे. त्याचे व्याजही दिलेले नाही. यामुळे व्याजासह संपूर्ण देणी मिळत नाहीत तोपर्यंत लढा सुरू ठेवणार असून उद्यापासून हे आंदोलन उग्र रूप धारण करेल असा इशाराही खोत यांनी दिला आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Municipal Election : भाजपविरोधात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; पुणे महापालिका निवडणुकीत संयुक्त रणनितीची शक्यता!

टी२० वर्ल्ड कपसाठी Shubham Gill ची जागा घेतली आता IPL फ्रँचायझी काढणार वचपा? 'त्या' Video नंतर चर्चा

Sandeep Naik: तिकीट न मिळाल्याने नाराज, पक्ष बदलला; पराभवानंतर संदीप नाईकांचे राजकीय पुनरागमन! राजकारणात खळबळ

Eggs Cause Cancer: अंडी खाल्ल्याने कर्करोग होतो का? FSSAI ने उघड केली वस्तुस्थिती, महत्त्वाची माहिती समोर

Latest Marathi News Live Update : जमिनीचा बेकायदा ताबा घेत खंडणी उकळल्याप्रकरणी बंडू आंदेकरला अटक

SCROLL FOR NEXT