public curfew Appeal for voluntary closure Administration rules not conditions 
कोल्हापूर

कोल्हापूरकरांनो जनता कर्फ्यूबाबत संभ्रम आहे का...? वाचा ही बातमी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शहरात वाढणारी रुग्णसंख्या चिंताजनक आहे. या पार्श्‍वभूमीवर महानगरपालिकेच्यावतीने शुक्रवारपासून जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. याला अनेक संघटनांचा विरोध आहे. चेंबर ऑफ कॉमर्सकडूनही बुधवार ( १६)पर्यंत जनता कर्फ्यू जाहीर केला आहे.

दरम्यान, या जनता कर्फ्यूमध्ये जिल्हा प्रशासनाचे कोणतेही नियम, अटी जाहीर केल्या जाणार नाहीत. लोकांनी स्वयंप्रेरणेने बंद पाळण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे जनता कर्फ्यूबाबत संभ्रम आहे.

प्रशासनाचे नियम, अटी नाहीत


कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी शुक्रवारपासून जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. पालिकेच्यावतीने मंगळवारी घेतलेल्या बैठकीतही अनेकांनी विरोध केला. त्यामुळे, जनता कर्फ्यूसाठी सक्ती केली जाणार नाही; पण स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन केले. प्रशासनाकडून कोणत्याही नियम, अटी जाहीर केलेल्या नाहीत. लॉकडाउन किंवा जनता कर्फ्यूमध्ये जिल्हा प्रशासनाकडून काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याची नियमावली बनवली जात होती. या कर्फ्यूमध्ये मात्र लोकांवर नियम, अटींचे बंधन नसणार आहे. 

स्वयंप्रेरणेने बंद ठेवण्याचे आवाहन

दरम्यान, या कर्फ्यूला रिक्षा संघटनांसह कामगारांनी विरोध करत, जनता कर्फ्यू पाळणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे नेमके काय चित्र असणार, हे पाहावे लागणार आहे. महानगरपालिकेच्या वतीने काय सुरू किंवा काय बंद राहणार, केएमटी बस सुरू राहणारी की बंद राहणार हे जाहीर केलेले नाही. शासनाने पूर्वी दिलेल्या नियम, अटीनुसार रिक्षा वाहतूक सुरू राहणार आहे. त्यामुळे जनता कर्फ्यू लोकांना संभ्रमात टाकणारा आहे.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : ‘एकनाथ शिंदे शहाणे व्हा’; मनोज जरांगेंचा संताप, उदय सामंतांनाही सुनावलं !

Numerology: बुध ग्रहाचा प्रभाव अन् तल्लख बुद्धी! तर्कशक्तीत असतात पटाईत; 'या' मूलांकाच्या लोकांमध्ये असते प्रचंड Curiosity....

Kisan Rail: किसान रेल नावालाच! शेतमालासाठी ३१ टक्केच वापर, व्यापारी वाहतुकीला प्राधान्य

स्वानंदी आई होणार? मल्लिका काकूचा नवा डाव, 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये नवा ट्विस्ट; प्रेक्षक मात्र खुश,म्हणतात-

Indian Army Success Story: 5 वर्षांतच राष्ट्रपतींच्या ADCपदी नियुक्ती! पहिली महिला आर्मी ऑफिसर ठरलेल्या मेजर नव्या शेखावत कोण?

SCROLL FOR NEXT