public curfew decision final in kolhapur city 
कोल्हापूर

मोठी बातमी ; कोल्हापुरात जनता कर्फ्यु जाहीर ; 'हे' राहणार सुरू अन् 'हे' राहणार बंद 

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर - कोल्हापुरात अकरा ते सोळा सप्टेंबमध्ये जनता कर्फ्यु करण्याचा निर्णय आज कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत घेण्यात आला. हा निर्णय घेण्यापूर्वी रेडिमेड कापड व्यवसायिकांनी याला विरोध केला. त्यामुळे या बैठकीत हातवारी आणि आरे तुरेपर्यंत वाद गेला. अखेर कापड व्यवसायिकांनी नाराजी व्यक्त करून काढता पाय घेतला. काहींनी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला मात्र तो असफल ठरला. मात्र चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी जनता कर्फ्युचा निर्णय बैठकीत जाहीर केला. जनता कर्फ्युमध्ये औद्योगिक वसाहतीतील काम, अत्यावश्‍यक वैद्यकीय सेवा, औषध दुकान, दूध आणि बॅंका सुरूच राहणार आहे, तर भाजीपाला, किराणा, मसाले, इतर सर्व व्यवसाय बंद ठेवणार असल्याचे शेटे यांनी जाहीर केले. 

जिल्ह्यातील आठ-नऊ तालुक्‍यांत स्वयंस्फुर्तीने जनता कर्फ्यु सुरू केला आहे. शिवाजी पेठेत स्वतंत्र निर्णय होत आहे. कोरोना विषाणुची साखळी तोडण्यासाठी अकरा ते सोळा सप्टेंबर दरम्यान कडक बंद पाळण्याचा निर्णय घेवूया, असे अवाहन चेंबरचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ संचालक आनंद माने यांनी येथे केले. यावेळी रेडिमेड कापड व्यवसायिकांनी त्याला विरोध केला. किती दिवस बंद ठेवायचे, प्रशासन त्यांचे अपयश झाकण्यासाठी लॉकडाऊन करीत आहे, पहिला लॉकडाऊन नियोजनासाठी होता तो मान्य होता. मात्र आता किती कर्जे काढायची, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी चौघांनी मिळून विरोध केला. यावर माने आणि इतर संचालकांनी आपल्या आणि कोल्हापूरच्या जनतेसाठी लॉकडाउन करूया अशी भूमिका घेतली. तरीही औद्योगिक वसाहतीतील प्रकाश मालडकर, कापड व्यापारी अजय मेहता, अमित केसवाणी यांच्यासह इतरांनी लॉकडाऊनला विरोध केला. यामुळे बैठकीत वाद झाला. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार झाला. आरे ला कारे झाले. बैठकीत असे बोलणे उचित नसल्याचा आरोप झाला. तुमचे समाजासाठी काय योगदान, फक्त व्यापार पाहू नका, अशा शब्दांपर्यंत वाद गेला. अखेर रेडिमेड कापड व्यवसायिक नाराजी व्यक्त करून बैठकीतून निघून गेले. 
यानंतर किराणा भुसारा, मसाले व्यापारी, धान्य मर्चेंट असोसिएशने लॉकडाउनला पाठिंबा दिला. तर काहींनी मेडिकलमध्ये कोल्ड्रींक्‍स्‌ आइस्क्रिम विक्री करू नये. औषधाच्या निमित्ताने तेथे गर्दी होते असे जाहीर केले. यानंतर बैठकीत मेडिकलमध्ये कोल्ड्रींक्‍स आणि आइस्क्रीम विक्री होणार नसल्याचे आश्‍वासन शेटे यांनी दिले. 

दरम्यान, जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यापासून कोरोनाचा कहरच सुरू आहे. रोज किमान 700 ते 800 नवे कोरोना रूग्ण सापडत आहेत. यावरून जिल्ह्यात समुह संसर्ग सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढत आहे.

एकीकडे कोरोनाचा जिल्ह्याला विळखा पडत असताना नागरिकांकडून मात्र योग्य ती खबरदारी घेत नसल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सहा तालुके आणि दोन नगरपालिका हद्दीत यापूर्वीच जनता कर्फ्यु जाहीर करण्यात आला आहे. पण शहरात यासंदर्भातील निर्णय घेण्यात व्यापारी वर्गाचा मोठा अडथळा होता. परंतु, व्यापाऱ्यांनी कोरोना संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यु पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

SCROLL FOR NEXT