Pune Bangalore Highway Sugarcane Rate Chakka Jam Andolan Raju Shetti esakal
कोल्हापूर

Kolhapur : तब्बल पाच हजारांहून अधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांची महामार्गावरच पडली पंगत; राजू शेट्टींनीही घेतलं पंगतीत बसून जेवण

शिरोली पुलावर सुरू असलेल्या चक्का जाम आंदोलनामध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत कोणताही निर्णय झाला नाही.

सकाळ डिजिटल टीम

सायंकाळी पाच वाजता महामार्गावरच तब्बल पाच हजारांहून अधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पंगत बसली. माजी खासदार राजू शेट्टी यांनीही शेतकऱ्यांसोबत पंगतीत बसून जेवण घेतले.

कोल्हापूर : चक्काजाम आंदोलनाला चार तास उलटल्यानंतरही प्रशासन आणि कारखानदारांकडून प्रतिसाद दिला जात नव्हता. त्यामुळे दिल्लीत झालेल्या शेतकरी आंदोलनासारखा ठिय्या मारण्याच्या निर्धार आंदोलकांनी केला. त्यानंतर, बघता-बघता दुपारच्या जेवणासाठी परिसरातील ग्रामीण भागातून तांदूळ, डाळ, भाज्या, पिठासह तयार भाकरी येण्याचा ओघ सुरू झाला.

महामार्गाशेजारी मोकळ्या जागेत स्वयंपाक तयार करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता महामार्गावरच तब्बल पाच हजारांहून अधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पंगत बसली. माजी खासदार राजू शेट्टी यांनीही शेतकऱ्यांसोबत पंगतीत बसून जेवण घेतले. शिरोली पुलावर सुरू असलेल्या चक्का जाम आंदोलनामध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी रात्रीच्या जेवणाचीही तयारी केली.

या जेवणासाठी नांदणी, जांभळीसह परिसरातील ग्रामस्थांनी पुढाकार घेण्यास सुरुवात केली. आंदोलनाला जमलेल्या कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनीही जेवणाचे विविध पदार्थ स्वखर्चाने आणण्यास सुरुवात केली. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही, असा कार्यकर्त्यांनी निर्धार केला. शेतकऱ्यांची ही एकजुटीची चर्चा चांगलीच रंगली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT