Pune Bangalore National Highway start traffic is on
Pune Bangalore National Highway start traffic is on 
कोल्हापूर

ती केवळ अफवाच पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्ग बंद नाही

युवराज पाटील

 कोल्हापूर (शिरोली पुलाची) :  पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गालतच्या सेवा मार्गावर पूराचे पाणी आल्यामुळे, सेवा मार्गावरील वाहतूक बंद केली असून, महामार्गावरील वाहतूक सुरू आहे. त्यामुळे महामार्ग बंद झाल्याच्या अफवा सोशल मिडीयावर व्हायरल होत असून, त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. 


संततधार पावसामुळे सांगली फाटा येथील सेवामार्गावर काल सांयकाळी पाणी आले आहे. या मार्गावर आज शेतकरी संघाचा पेट्रोल पंप, हॉटेल जय हिंद दरम्यान पाणी आले आहे. सुमारे दीड ते दोन फूट पाणी रस्त्यावर आहे. महामार्गाची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या जय हिंद रोड बिल्डर्सने बॅरेकेट लावून, या मार्गावरीर वाहतूक बंद केली आहे. पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने, या भागातील व्यवसायीकांनी साहित्य बाहेर काढले आहे. 


२००५ व २०१९ ला महामार्गावर येथूनच पाणी आले होते. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याची अफवा सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्यामुळे चौकशीसाठी फोन येत आहेत ; मात्र महामार्गावरील वाहतूक सुरु असून, पावसाचा जोर ओसरल्यामुळे वाहतूक बंद होण्याची शक्यता नाही.

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT