pune division graduate teachers legislative council constituency voting update BJP state president Chandrakant Patil information 
कोल्हापूर

मुंबईतून बॉलिवूड कोणीही हलवू शकणार नाही; चंद्रकांत पाटील

ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर :  बॉलिवूडसाठी मुंबईमध्ये ज्या सुविधा आहेत. त्या देशात अन्यत्र नाहीत. त्यामुळे मुंबईमधून बॉलिवूड कोणीही हलवू शकणार नाही. असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

येथील महाराष्ट्र हायस्कूल मध्ये जाऊन त्यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  बॉलिवूड उत्तर प्रदेश मध्ये घेऊन जाणार असे म्हणाले होते. आज त्यांचा मुंबई दौरा आहे. याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, वर्षानुवर्षे चित्रपट निर्मिती मुंबईमध्ये होत आहे. त्यासाठी आवश्यक असणारी सर्व साधने, कलाकार, कारागीर, स्टुडिओ मुंबईमध्ये विकसित झाले आहेत. ज्या सुविधा बॉलिवूडला आवश्यक आहेत, त्या सर्व मुंबईत उपलब्ध आहेत. त्यामुळे मुंबईतून  बॉलिवूड कोणीही हलवू शकणार नाही.

योगी आदित्यनाथ  बॉलिवूड च्या धरतीवर उत्तर प्रदेश मध्ये चित्रपट निर्मिती व्यवसाय सुरू करू शकतील. त्याचा अभ्यास करण्यासाठी कदाचित ते आले असावेत.राज्यातील सर्व विधान परिषद जागा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जिंकतील.  विधान परिषदेमध्ये भाजप बहुमताच्या जवळ पोहोचेल. असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Latest Marathi News Live Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अलर्ट जारी

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

SCROLL FOR NEXT