pune division graduate teachers legislative council constituency voting update
pune division graduate teachers legislative council constituency voting update 
कोल्हापूर

मतदानाचा टक्का वाढला; पदवीधर तीन, शिक्षकमध्ये दीडपट वाढ

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी काल मतदान झाले. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानात सुमारे तीनपट वाढ झाल्याचे दिसून आले. 
 

गेल्या निवडणुकीत पदवीधरसाठी २७.३३ टक्के मतदान झाले होते.  यंदा मतदान संपेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार तब्बल ६८.०९ टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीत शिक्षक मतदारसंघात ५५ टक्के मतदान झाले होते. या वर्षी ८६.७ टक्के मतदान झाले. नव्याने बनवण्यात आलेली मतदार यादी, निवडणुकीत चुरस यामुळे हे मतदान वाढले, असा अंदाज आहे. शिक्षक मतदारसंघात स्थानिक उमेदवार असल्याने मतदानाची टक्केवारी वाढल्याचे सांगितले जाते.


पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणूक ही पूर्वी राजकीय वर्तुळातही फारशी चर्चिली जात नव्हती. मतदानाच्या अतिशय कमी टक्केवारीमुळे येथील जय-पराजयाची गणितेही ठरलेली होती; मात्र यंदा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीला वेळगेच स्वरूप प्राप्त झाले. 


मतदार यादी नव्याने होणार असल्याने राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणि इच्छुक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली. प्रचारातील आरोप-प्रत्यारोप, नेत्यांची विधाने यामुळे निवडणुकीला राजकीय रंग प्राप्त झाला. नव्याने नोंदणी केलेला युवा मतदार मतदानासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडला. त्यामुळे यंदा मतदानाची टक्केवारी वाढली.

आकडे बोलतात...

वर्ष    मतदारसंघ    मतदारसंख्या    मतदान टक्केवारी
२०१४    पदवीधर    १,२०,८१३    २७.३३
२०२०    पदवीधर    ८९,५२९    ६८.०९
२०१४    शिक्षक    ९,६६२     ५५
२०१९    शिक्षक    १२,२३७    ८६.७

संपादन- अर्चना बनगे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT