Pune Division Graduates Teachers Constituency Election Counting begins 
कोल्हापूर

मतमोजणीला जाण्याआधी आसगावकरांच्या समर्थकांचा जल्लोष

सुनील पाटील

कोल्हापूर -   पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाच्या मतमोजणीसाठी जाण्याआधी म्हणजे सकाळी तांबडं फुटायलाच (सूर्योदयलाच) शिक्षक मतदार संघातील उमेदवार जयंत आसगावकर (कोल्हापूर) यांच्यासोबत समर्थकांनी गुलाल लावून विजय उत्सव साजरा करूनच मतमोजणी केंद्रावर दाखल झाले. 


पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुल येथे मतमोजणी होत आहे . शिक्षक मतदार संघासाठी 42 टेबल वरती मतमोजणी होईल. प्रत्येक फेरीत तेराशे मतदान मोजले जातील. मतमोजणीचा अधिकृत निकाल डिसेंबरला पहाटे जाहीर होण्याची शक्‍यता आहे. तत्पूर्वी शिक्षक मतदार संघातील कॉंग्रेसचे उमेदवार जयंत आसगावकर (कोल्हापूर) यांनी आज सकाळी मतमोजणी केंद्रात जाण्याआधीच त्यांच्या समर्थकांनी एकमेकांना गुलाल लावत तासगावकर यांचा जयघोष केला. रात्री उशिरापर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती आणि कसे मतदान झाले, याची गोळाबेरीज करणारे समर्थक आज पहाटे ही लवकर उठले. दरम्यान गेल्या महिनाभर सुरू असलेला प्रचाराचा धडाका. त्याला मिळणारा चांगला प्रतिसाद यामुळे आसगावकऱ्यांच्या समर्थकांना विजयाची खात्री वाटू लागली आहे. त्यामुळेच त्यांनी आज सुर्योदयालाच जयंत आसगावकर यांच्या जयघोष करत विजय उत्सव साजरा केला. 


संपादन - धनाजी सुर्वे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT