Pune Shikshak constituency six candidates are return application in kolhapur district 
कोल्हापूर

विधानपरिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघातून कोल्हापुरातील सहा जणांची माघार

ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर : पुणे शिक्षक मतदार संघातून जिल्ह्यातील सहा जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. यामध्ये शिक्षक भारती पुणे विभाग अध्यक्ष दादासाहेब लाड, कायम विनाअनुदानित कृती समितीचे अध्यक्ष खंडेराव जगदाळे यांचा समावेश आहे. काँग्रेसचे जयंत आसगावकर, सुटाचे  प्रा. डॉ. सुभाष जाधव, प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार, करण सरनोबत यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.

विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक एक डिसेंबर रोजी होणार आहे. आज उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत होती. जिल्ह्यातून अकरा जणांनी या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरले होते. त्यातील सहा जणांनी आपली उमेदवारी आज मागे घेतले. दादासाहेब लाड, खंडेराव जगदाळे, संभाजी खोपडे (इचलकरंजी), बाबासो पाटील (घोटवडे), मानसिंग निंबाळकर (शिवाजी विद्यापीठ) शिवाजीराव मोहरे यांचा समावेश आहे. 

पालकमंत्री सतेज पाटील व ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या शब्दाला मान देऊन उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे असे दादासाहेब लाड यांनी सांगितले.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात मोठा बदल? पेन्शनधारकांना मिळू शकते ४५ हजारांची किमान पेन्शन

Pune Stunt Video : पुण्यात परप्रांतीय तरुणांचा मध्यरात्री धिंगाणा, दारूच्या नशेत भरधाव कारमधून जीवघेणी स्टंटबाजी अन्... व्हिडिओ व्हायरल

CIDCO Housing Lottery: स्वातंत्र्य दिनानिमित्त ४,७७९ घरांची लॉटरी सिडकोची 'ईडब्ल्यूएस'साठी संधी

Hardik Pandya Trade: मोठा ट्विस्ट! Mumbai Indians च्या हार्दिकला पुन्हा गुजरात टायटन्सकडे जायचंय, कर्णधार व्हायचंय; शुभमन गिलचं काय होणार?

Marathi News Live Updates : श्रावणात त्र्यंबकेश्वरचे व्हीआयपी दर्शन बंद

SCROLL FOR NEXT