Quality education for every child in the city 
कोल्हापूर

शहरातील प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर  : शहरातील प्रत्येक मुलाला शाळेच्या प्रवाहात आणून त्याला दर्जेदार शिक्षण दिले जाईल. प्रभागस्तरावर नगरसेवकांच्या अध्यक्षतेखाली बाल संरक्षण समितीची स्थापना करण्यात येईल, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज स्पष्ट केले. महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीतर्फे शाळाबाहय मुलांचे शिक्षण व शहरात स्थलांतरीत होऊन आलेल्या बालकांच्या शिक्षणाबाबतचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिकास्तरीय समितीची बैठक झाली. या बैठकीत आयुक्त डॉ. कलशेट्टी बोलत होते. 

ते म्हणाले, शहरात साखर कारखाना परिसर आणि वीट भट्टीच्या कामासाठी प्रामुख्याने बीड, अहमदनगर, जालना, नाशिक तसेच सीमा भागातून पालकांचे स्थलांतर होत असते. त्यांच्याबरोबर त्यांची मुलेही येतात, अशी स्थलांतरीत मुले शाळेच्या प्रवाहाबाहेर राहू नयेत, त्यांनाही शिक्षण मिळावे, त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी महापालिकेचा शिक्षण विभाग प्रयत्नशील असल्याचे प्रशासनाधिकारी शंकर यादव यांनी सांगितले. 

शहरातील सर्व शाळांना शाळाबाहय मूल दिसल्यास तात्काळ दाखल करुन घेण्याच्या सूचना केल्या आहेत. स्थलांतरीत मुलांना त्यांचा येथील कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना शिक्षण हमी कार्ड पुरविण्यात यावेत, जेणेकरुन त्यांच्या मूळ शाळेत दाखल होताना त्याचा उपयोग होईल, अशी सूचना अतूल देसाई यांनी केली. डाएटचे प्राचार्य डॉ. आय.सी. शेख यांनी शाळाबाहय व स्थलांतरीत मुलांना दाखल करुन घेणे महत्वाचे काम शहरात सुरु असून शाळाबाहय मूलविरहीत शहर करण्याचे आवाहन त्यांनी केले. 
बैठकीस महापालिकेचे कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड, समग्र शिक्षा कार्यक्रम अधिकारी रसूल पाटील, बालरक्षक संजय कडगांवे, लेखापाल बाबा साळोखे, पर्यवेक्षक विजय माळी, शांताराम सुतार आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT