Quarantine had to be done instead of entering the house 
कोल्हापूर

गृहप्रवेश करण्याऐवजी व्हावे लागले क्वारंटाईन 

नंदिनी नरेवाडी

कोल्हापूर : सोलापुरात विवाह सोहळा झाला. कोरोना संसर्गाचा धोका असल्यामुळे लग्नाच्या दिवशी कोल्हापुरात येण्याचा ई पास काढला होता. त्यामुळे सप्तपदीनंतर नवदांपत्य कोल्हापुरात आले. सीमानाक्‍यावर तपासणीनंतर थेट सीपीआरमध्येच पाठविले आणि गृहप्रवेशाऐवजी क्वारंटाईन होण्याची वेळ नवदांपत्यांवर आली. 

अनोळखी शहरात, अनोळखी माणसांसोबत आलेल्या नव-वधूची मात्र घालमेल वाढली. गृहप्रवेशानंतर नांदण्याऐवजी क्वारंटाईन व्हावे लागले. अशा काळात तिला मानसिक बळ देण्याचे काम सीपीआरच्या मानसोपचार विभागाने केले आणि नवदांपत्यांना विवाहाची नवप्रचितीच दिली. 
लग्न म्हणजे नव्या आयुष्याची सुरवात. लग्नानंतरचे पहिले काही दिवस म्हणजे सुखी संसाराची स्वप्ने रंगविण्याचा काळ. नववधू व वराने एकमेकांना समजून घेण्यासाठीही तो काळ महत्त्वाचा. नव्या आयुष्याविषयी वाटणारी हुरहूर, जीवनशैलीतील बदल या मानसिक अवस्थेतून नवदांपत्य जाते; मात्र कोरोनाच्या काळात विवाह करणाऱ्या दांपत्यांना मात्र वेगळ्याच मानसिक अवस्थेतून जावे लागत आहे. 

विशेषतः नववधूला अनोळखी शहरात कसे जुळवून घ्यायचे हे कळण्यापूर्वीच मेहंदी, भरजरी शालू, चुडा अशाच स्थितीत तिची रवानगी अलगीकरण कक्षात होते. तिला स्वॅब देणे, आरोग्याच्या तपासण्यांनाही सामोरे जावे लागते. या काळात जाव्या लागणाऱ्या मानसिक अवस्थेत तिला मानसोपचार विभाग मदतीचा हात देतो आहे. क्वारंटाईनच्या चौदा दिवसांत तिचे मानसिक बळ टिकून राहावे, यासाठी समुपदेशन करतात. आणि वैवाहिक आयुष्याचा उत्साह टिकवून ठेवतात. 

असाही एक प्रसंग 
चार महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह ठरला होता; मात्र लॉकडाउनमुळे नियोजित मुहूर्त लांबणीवर पडला. अखेर लॉकडाउनमध्येच लग्न करणाचा निर्णय दोन्ही कुटुंबांनी घेतला. शासनाच्या सर्व बाबींची पूर्तता करून विवाहाची तारीख निश्‍चित केली. पुण्याहून कोल्हापुरात आल्यावर मात्र नवरदेवाला क्वारंटाईन केले आणि नियोजित विवाह पुन्हा लांबणीवर पडला. 

शेजाऱ्यांचा मानसिक त्रास 

नॉन रेडझोनमधून आल्यानंतर कोरोनाची लक्षणे नसतील तर गृहअलगीकरणही केले जाते. मात्र विवाहसोहळ्यानंतर परजिल्ह्यातून आल्यानंतर शेजारील नागरिक तक्रार करतात. नवदांम्पत्यांचा स्वॅब घेण्याची मागणी होते आणि पुन्हा त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. अशाही स्थितीत मानसोपचार विभाग त्यांच्या मदतीला धावतो आहे. 

विवाहानंतर गृहप्रवेशाऐवजी क्वांरटाईन केल्यामुळे नवदांपत्यांना वेगळ्या मानसिकतेतून जावे लागते. अशा वेळी समुपदेशनाच्या माध्यमातून त्यांना मानसिक आधार दिला जातो आहे. 
- माहेश्‍वरी पुजारी, समुपदेशक, सीपीआर 

 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : काय चाललंय? धबधब्याखाली दोन मुले आक्षेपार्ह अवस्थेत, लोकांच्या माना लाजेने खाली, सार्वजनिक ठिकाण तरी सोडा रे...

Chakan MIDC : चाकण एमआयडीसी परिसरात वर्तुळाकार बससेवा, पीएमपी प्रशासनाचा निर्णय; अध्यक्षांकडून पाहणी

Vlogger of the Year: लोहार यांचा व्लॉगर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान

Indrayani River : ‘इंद्रायणी-पवना सुधार’ निविदेसाठी सल्लागार, चार महिन्यांत कार्यवाहीनंतर काम सुरू होणार; ‘पीएमआरडीए’ची माहिती

Solapur: डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणी डॉ. उमा वळसंगकरांचा मनीषा मानेंविरुद्ध नवा अर्ज; आर्थिक अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करा

SCROLL FOR NEXT