quarantine person work in flour mill kolhapur 
कोल्हापूर

बापरे कधी सुधारणार हे? क्वारंटाईन असूनही गिरणीत काम 

राजेश मोरे

कोल्हापूर -  कोल्हापुरात कोरोनाचा कहर वाढत आहे. रोज सहाशे ते हजार रूग्ण सापडत आहेत. त्यामुळे प्रशासन कोरोनाविरोधात लढण्यासाठी जीवाचे राण करत आहे. परंतु, नागरिकांना त्याचे गांभिर्य नसल्याचे वारंवार समोर येत आहे. कोल्हापुरातही नुकतीच अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. क्वारंटाईन असूनही पिठाची गिरण आणि मिरची कांडप चालविल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे संबंधित तरूणाला आज पाच हजाराच्या दंडाचा दणका बसला. महापालिका, जुना राजवाडा पोलिसांनी आज संयुक्तरित्या ही कारवाई केली. 

कोल्हापूर सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी महापालिका प्रशासनाने मास्क न लावता फिरणाऱ्यांवर कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यात क्‍वारंटाईन असतानाही बाहेर अढळणाऱ्या व्यक्तींविरोधात तर पाच हजार रुपये दंडाची कारवाई सुरू केली. कारवाईवेळी संबधितांकडून प्रशासनाला कडाडून विरोध केला जात होता. त्यामुळे महापालिका प्रशासनाने कारवाईसाठी पोलिस प्रशासनाची मदत मागितली होती. एक वाहतूक पोलिस, पोलिस कर्मचारीसह दोन होमगार्ड असा बंदोबस्त पोलिसांकडून पुरविण्यात आला. 

दरम्यान, आज आपटेनगर ते फुलेवाडी रिंगरोडवर एक क्वारंटाईन तरूण पिठाच्या गिरणीत काम करत असल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना मिळाली. त्यांनी महापालिकेच्या पथकाच्या मदतीने गिरणीसह मिरची कांडपात काम करणाऱ्या संबधित तरूणावर पाच हजार रुपये दंडाची कारवाई केली. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT