कोल्हापूर

कमी पटसंख्येच्या शाळांचा प्रश्‍न ऐरणीवर 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यातील 10 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथिमक शाळांची माहिती राज्य शासनाने मागवली आहे. त्यामुळे पुन्हा या शाळा बंद करण्याचा निर्णय शासन घेणार का हा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

मात्र याबाबत कोणतेही लेखी आदेश अद्याप प्राप्त न झाल्याचे प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. राज्यातील 10 पेक्षा कमी पट संख्या असणाऱ्या शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्यांचे समायोजन जवळपासच्या दुसऱ्या शाळेत करावे, असा आदेश गेल्या वर्षी राज्य शासनाने काढला होता. 

यावेळी कोल्हापुरात जोरदार आंदोलन झाले होते. या आंदोलनात शिक्षण बचाव कृती समितीसह विविध शिक्षक संघटना, डाव्या संघटना उतरल्या होत्या. तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी कोल्हापुरात येऊन आंदोलकांशी संवाद साधला होता. त्यानंतर जिल्ह्यातील कमी पटसंख्येच्या शाळा बंद न करण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र आता पुन्हा या शाळांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

राज्य शासनाने जिल्ह्यातील 10 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांची माहिती मागवली होती. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने ही माहिती दिली आहे. मात्र या शाळा बंद करायच्या की नाहीत, याबाबत कोणताही लेखी आदेश आलेला नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

राज्य शासनाने जिल्ह्यातील 10 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांची माहिती मागवली होती. ती पाठवण्यात आली आहे. मात्र याबाबत कोणताही लेखी आदेश अद्याप आलेला नाही. त्यामुळे या शाळांबाबतचा कोणताही निर्णय झालेला नाही. 
- आशा उबाळे, प्राथमिक शिक्षण अधिकारी. 

दृष्टिक्षेपात संस्था 
प्राथमिक शाळांची संख्या - 1977 
10 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा - 165 
विद्यार्थी संख्या - सुमारे 1650 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi: CSK विरुद्ध काय प्लॅन केला होता? सूर्यवंशीचा खुलासा; वाढदिवसाच्या सेलिब्रेशनबद्दल म्हणाला, 'केक लावतील म्हणून...'

'माझ्या भावाने मला 'घंटागाडी'....' ठरलं तर मग मालिकेतील जुई गडकरीला घरी काय नावाने हाक मारतात? अभिनेत्री म्हणाली...

Latest Marathi News Live Update : विदर्भात अवकाळी पावसाचा कहर; रब्बी पिकांचे मोठे नुकसान

IPL 2026: फॉर्म, फटका आणि फोकसची परीक्षा! शुभमन गिल-श्रेयस अय्यर आज आमणे सामने; कशी असेल संभावित Playing XI

Nagpur News: कामगाराचा पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह; कामगाराची पार्श्वभूमी व रहिवास

SCROLL FOR NEXT