कोल्हापूर

सीएचबी प्राध्यापकांचा  उदरनिर्वाहाचा  प्रश्‍न गंभीर; कोरोनामुळे शैक्षणिक वर्षही अनिश्‍चत 

मतीन शेख

कोल्हापूर : कोरोना महामारीमुळे अनेकांच्या नोकरीवर गदा आली आहे. लॉकडाउन काळात पेमेंटही डाउन झाल्याने आर्थिक स्थिती बिघडली आहे. सध्या राज्यातील तासिका तत्त्वावरील शिक्षकांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. विविध शैक्षणिक संस्थांत अध्यापनाचे काम करणाऱ्या सीएचबी प्राध्यापकांचे वेतन मागील शैक्षणिक वर्षापासून थांबले आहे. ते लवकर मिळावे व लॉकडाउनच्या काळातीलही मानधन मिळावे, अशी मागणी होत आहे. 
सेट-नेट उत्तीर्ण होत पीएचडीही मिळवत प्राध्यापक बनण्याचे स्वप्न पाहिलेल्या अनेकांना कायमस्वरूपी नोकरीपासून दूर राहावे लागले आहे. त्यांच्या पदरात पडली सीएचबीसारखी वेठबिगारी. शासन आणि संस्थाचालक या दोघांच्या चुकीच्या धोरणामुळे यांची ससेहोलपट सुरू आहे. कोरोना काळात ती अधिकच वाढली आहे. आठ-दहा वर्षे राबूनही कायम न झालेल्यांनी संसाराचा गाढा कसा ओढायचा, असा पोटाचा प्रश्‍न पुढे आला आहे, तर अनेक अविवाहित युवकांचे लग्न ठरत नसल्याचे वास्तव आहे. तुटपुंजे मानधनही सध्या बंद असल्याने व संस्थेने निर्णय होईपर्यंत कामावर न परतण्याचे पत्रच काढल्याने सीएचबीधारक अधिक अस्वस्थ आहेत. 
लॉकडाउनपूर्वी नॅक मूल्यांकनासाठी विविध कामांचे रेकॉर्ड अहवालांच्या फायलींच्या कामात गुंतून गेलेल्या सीएचबी प्राध्यापकांचा विचार या कठीण काळात संस्थाचालक करत नसल्याचे दिसते. थकलेला पगार मिळत नाही आणि दुसरे शैक्षणिक वर्षांचे काय होणार? असा दुहेरी प्रश्‍न पुढे आहे. 

तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची नियुक्ती थांबणार? 
आजवर तासिका तत्त्वावर, अभ्यागत किंवा कंत्राट पद्धतीने करण्यात येणारी प्राध्यापकांची नियुक्ती बंद करण्यात येईल, असा राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या मसुद्यात उल्लेख असल्याने सीएचबी प्राध्यापकांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. 

मुदतवाढ देण्याची मागणी 
शिवाजी विद्यापीठातील कंत्राटी प्राध्यापकांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला, परंतु सीएचबीधारकांना मात्र वेतनापासून वंचित ठेवत पुढील निर्णयापर्यंत "जैसे थे' थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत. सीएचबीधारकांनाही मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत आहे. 


सीएचबी प्राध्यापकांना तुटपुंजे मानधन मिळते. ते वेळेवर मिळत नाही. लॉकडाउनच्या काळात कामावर न येण्याच्या सूचना संस्थेकडून केल्या आहेत. संस्थेने संचिन निधीतून या कठीण काळात मानधन द्यावे. तसेच सहायक प्राध्यापकांची रिक्त पदे भरणे गरजेचे आहे. 
- प्रा. दत्ता जाधव. 

दहा वर्षापासून तासिका तत्त्वावर अध्यापन करत आहे. मिळत असलेल्या मानधनावर उदरनिर्वाह करणे कठीण जाते. या महामारीच्या काळात मानधन व काम थांबले आहे. शासन, संस्थेने पुढील नेमणुकीसाठी लवकर निर्णय घेणे अपेक्षित आहे. 
- प्रा. करीम मुल्ला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हार्दिक पांड्या १० षटकं फेकू शतक नाही! गौतम गंभीरचं ऑल राऊंडरच्या भविष्याबाबत मोठं विधान; म्हणाला, नितीश कुमार रेड्डी...

IND vs AFG: थांब आधी तुझे केस नीट करू... वैभव सूर्यवंशीचा मालिका विजयानंतर अभिषेक शर्मासोबत Bromance; Viral Video

Primary Teachers: पोर्टल, प्रशिक्षण, सर्वेक्षण अन् समित्या; शिक्षकांच्या ७२ कामांची यादी पाहून अध्यापनाचा प्रश्न ऐरणीवर

Marathi News Live Updates : शरद पवारांच्या पत्रानंतर सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; १७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे मंत्र्यांचे निर्देश

Santosh Pandit Latest News : संतोष पंडित पुन्हा व्हिडिओ करणार? जामिनावर बाहेर येताच दिला थेट इशारा; ‘मी थांबणार नाही’

SCROLL FOR NEXT