Queues of vehicles at Kini toll on the National Highway 
कोल्हापूर

किणी टोलनाक्यावर लागलेत वाहनांच्या लांबच लांब रांगा ; प्रवासी मात्र संतप्त...

संजय पाटील

घुणकी (कोल्हापूर) - राष्ट्रीय महामार्गावरील किणी येथील पथकर नाक्यावरील तपासणी केंद्रावर तपासणीसाठी वेळ लागत असल्याने वाहनांच्या रांगा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना भर उन्हात ताटकळत थांबावे लागत असल्याने संतापाच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. तपासणी केंद्राची संख्या वाढविण्याची गरज आहे. अन्यथा उद्रेक होण्याची शक्यता आहे.

पुणे बंगळूर महामार्गावरील

कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या सिमेवरील कणेगांव (जि.सांगली) येथे परराज्यातील वाहनांची तपासणी करुन त्यांना किणी पथकर नाक्यावरुन वेगळ्या लेनमधून सोडले जाते. कोल्हापूर जिल्ह्यात जाणाऱ्या प्रवाशी वाहनांची तपासणी किणी (ता.हातकणंगले) येथील पथकर नाक्यावरील तपासणी केंद्रात केली जाते. मात्र वाहनांची संख्या प्रचंड असताना केवळ पाच ठिकाणी तपासणी केली जाते. तपासणीसही वेळ लागत असल्याने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सकाळी आलेली वाहने दुपारी केंद्रावर  पोहचली. वाहनातील अबालवृध्दाना उन्हाच्या झळा सोसत रस्त्यावर थांबावे लागले. बालकांचे रडणे पालकांना घायाळ करीत होते. त्यामुळे अनेक पालकांनी रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांचा आसरा घेतला.

तपासणी केंद्रात वाढ करावी

तपासणी केंद्रावर होणाऱ्या विलंबाबात प्रवाशांनी संतापाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पहाटे पाच वाजता येऊनही दुपारी एक वाजता तपासणी केंद्रावर पोहचलो नसून सकाळ पासून सर्वजन उपाशी असून लहान मुलांची अवस्था दयनीय झाली आहे. तपासणी केंद्रात वाढ करून यापुढे येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळावी अशीही प्रतिक्रिया व्यक्त झाली.

दरम्यान दुपारी जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख यांनी भेट सुचना दिल्या. जिल्ह्यातील कोरोना पाँझिटिव्हची संख्या वाढत असल्याने तपासणी केली जात आहे. प्रवाशांना त्रास होत आहे याची जाणीव आहे पण कोरोनावर नियंत्रणासाठी सहकार्य करावे असेही आवाहन त्यांनी केले.
घुणकी मार्गे वाहने जाऊ लागल्याने इथे पोलीस बंदोबस्त सुरू झाल्याने वाहन चालकांना किणी पथकर नाक्यावर   तपासणी शिवाय पर्याय राहिला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Accident : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : मिरज शासकीय रुग्णालयाचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT