Race of hurdles in the survey Closing thermal scanners pad masks and hand gloves
Race of hurdles in the survey Closing thermal scanners pad masks and hand gloves 
कोल्हापूर

‘सर्वेक्षणात अडथळ्यांची शर्यत ; अपुऱ्या साधनांत काम करायचे की मरायचे?

नंदिनी नरेवाडी

कोल्हापूर : दिवसाला ५५ घरे फिरायची, घराघरांतील लोकांचा ताप मोजायचा, आरोग्याची माहिती नोंद करायची... या वेळी थर्मल स्कॅनर कधी बंद पडते; तर ऑक्‍सिमीटर आकडेच दाखवत नाही आणि ‘घरात कोण नाही, उद्या या!’ अशा पाणउताऱ्याचा सूर ऐकायचा, सर्वे करताना यंत्रणेने मास्क दिले नाहीत, हॅण्डग्लोज पदरचे वापरायचे, अशा अपुऱ्या साधनांवर शासकीय कर्मचाऱ्यांचे पथक दारोदार फिरत माहिती घेत आहे, ‘आम्ही काम करायचे की मरायचे’ असाच सवाल या सर्वेक्षण पथकापुढे आहे. यात कर्करोगग्रस्त शिक्षक, शस्त्रक्रिया झालेली आशा कर्मचारी आहे. अशा अनेक अडथळ्यांचा सामना करीत हे पथक सर्वेक्षणाचे काम करीत आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या सर्वेक्षणाचा गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील ग्राउंड रिपोर्ट.

आशा, अंगणवाडी सेविका आणि हायस्कूलचे शिक्षक असे तीन जणांचे पथक सर्वेक्षण करते. सकाळी नऊला हे पथक बाहेर पडले. लोकरे पाणंदीतील घरांकडे त्यांनी मोर्चा वळविला. सुरवातीला पहिल्याच घरासमोर त्यांनी हाक मारली. ‘कोण आहे का?’ पाच ते दहा मिनिटांनी एक महिला बाहेर आली. आशाने त्यांना सूचना केली, ‘मास्क घालून या’. ती महिला म्हणाली, ‘आम्ही घरातच हाय की मास्क कशाला?’ मग आशा म्हणाली, ‘तुम्ही घरातच असता. पण, आम्ही बाहेरून आलोय, मास्क घाला.’ त्या महिलेकडून त्यांनी कुटुंबातल्या सदस्यांची नावे, वय, कोण आजारी आहे का? कोणाला बीपी शुगरचा त्रास आहे का? अशी माहिती घेतली. तिच्या हातावर सॅनिटायझर दिले. त्यानंतर तिच्या बोटाला ऑक्‍सिमीटर लावले.

ऑक्‍सिमीटर पाहिल्यावर त्यावर आकडे आले नाहीत. शासनाने खराब ऑक्‍सिमीटर दिल्याने ही अडचण येत असल्याचे आशाने सांगितले. मग आशाने बॅगेतील स्वतःचे ऑक्‍सिमीटर काढले. ते लावल्यावर त्याची नोंद करून घेतली. थर्मल स्कॅनरने तापमान नोंदविले. दुसऱ्या घरात महिलेने पती नाहीयेत, उद्या या, असे सांगितले. लगेचच आशा, अंगणवाडी सेविकेने त्यांची तपासणी उद्या करू, माहिती द्या, असे सांगितले. ती महिला विनामास्कचीच बाहेर आली. तिलाही मास्क घालून या, अशी सूचना केली. त्या कुटुंबाची माहिती नोंदवली. त्यांचे सहा महिन्यांचे बाळ आणि दोन वर्षांच्या मुलीची ऑक्‍सिजनची पातळी नोंदवली. त्याचवेळी अंगणवाडी सेविकेने कपाळावर थर्मल स्कॅनर लावल्यावर त्यावरही आकडे दिसेनात. त्यांनी थर्मल स्कॅनरचे सेल बाहेर काढले. पुन्हा घातले. त्यानंतर हे थर्मल स्कॅनर व्यवस्थित सुरू झाले. त्या महिलेचे पती कधी येणार, याची माहिती घेतली आणि निघाले. तिसऱ्या घराला कुलूप असल्याने बंद घर अशी नोंद करून पुढच्या घरात त्यांचे सर्वेक्षण सुरू झाले. दोन हजार घरे, ६०० कुटुंबांचा सर्वे या पथकाकडून सुरू आहे. 

कर्करोगग्रस्त शिक्षक, शस्त्रक्रिया झालेली आशा
गडमुडशिंगीत आशा कर्मचारी मीनाक्षी पाटील, अंगणवाडी सेविका स्नेहल पाटील आणि शिक्षक उत्तम अर्जुनवाडे हे सर्वेक्षणाचे काम करीत आहेत. श्री. अर्जुनवाडे हे कर्करोगग्रस्त असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दहा-बारा दिवस कधी उन्हाचा तडाखा, तर कधी पाऊस झेलत ते सर्वेक्षणात सहभागी आहेत. हे काम देऊ नये, असे त्यांनी शासकीय यंत्रणेला सांगूनही त्यांची दखल घेतलेली नाही. मीनाक्षी पाटील यांचीही काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांनाही यातून सवलत दिलेली नाही.

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT