कोल्हापूर

राधानगरी धरणाची पाणीपातळी घटली; स्वयंचलित दरवाजे होणार बंद

राजू पाटील : सकाळ वृत्तसेवा

राधानगरी (कोल्हापूर) : राधानगरी (Radhanagari) तालुक्यातील तिन्ही धरणांवर पावसाने आज पूर्णतः उघडीप दिली आहे. परिणामी राधानगरी धरणाची पाणी पातळी कमी झाली असून टप्प्याटप्प्याने उघडलेले स्वयंचलित दरवाजे बंद होऊ लागले आहेत. यामुळे भोगावती (Bhogavati,Panchganga River) सह पंचगंगेचा महापूर आटोक्यात येणार आहे अशी स्थिती पुढे येत आहे. सध्या पाणी पातळी कमी झाल्याने तीन स्वयंचलीत दरवाजे बंद झाले आहेत. (radhanagari-dam-kolhapur-rain-update-akb84)

तुळशी आणि काळम्मावाडी धरणातून विसर्ग सुरू करण्याचे नियोजन जलसंपदा विभागाचे आहे.पावसाने आठ दिवस धुमाकूळ घातल्यानंतर धरणे भरण्याच्या टप्प्यावरच पावसाने घेतलेली विश्रांती ही भविष्यातील फार मोठा अनर्थ टाळणारी ठरली आहे. राधानगरी धरण भरल्यानंतर काल पाच स्वयंचलित दरवाजे खुले झाले होते. ते आज सकाळपर्यंत खुले होते.

दरम्यान 347 . 57 फुटाची पाणीपातळी कमी होऊन 347 फुटापर्यंत खाली आली. यामुळे स्वयंचलित दरवाजे दरवाज्यावरील ताण कमी होऊन आता हळूहळू दरवाजे बंद होत आहे. पाणलोट क्षेत्रातून पाणी येत असले तरी आज पुर्ण उघडीप दिल्याने याचा ओघ कमी राहणार आहे.परिणामी भोगावती आणि पंचगंगा नदीची पाणीपातळी झपाट्याने ओसरण्यास मदत होईल.

आज काळम्मावाडी धरण सांडवा पातळीच्या वर आल्याने त्यातील पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. यामुळे दूधगंगेची पाणी पातळी वाढणार आहे. त्याबरोबरच तुळशी धरणातूनही 750 ते 1000 क्यूसेक इतका विसर्ग सुरू करण्याचे नियोजन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT