पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्ग 2 तासात सुरू होण्याची शक्यता

पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्ग 2 तासात  सुरू होण्याची शक्यता
Updated on

शिरोली पुलाची (कोल्हापूर) : पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील (Pune-Bangalore-National-Highway)वाहतूक सुरू करण्यासाठी सकाळी पोकलॅडची चाचणी यशस्वी झाली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या परवानगी नंतर अत्यावश्यक सेवेतील अवजड वाहतूक सुरू करण्यात येणार असून, दोन तासात वाहतूक सुरू होईल असा विश्वास सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले (Kiran Bhosale)यांनी व्यक्त केला. Pune-Bangalore-National-Highway-start-in-two-hours-kolhapur-rain-live-update-akb84

पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्ग 2 तासात  सुरू होण्याची शक्यता
अजित पवारांच्या दौऱ्यात बदल; सांगलीकडे रवाना

राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर सुमारे दीड फूट व पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावर सुमारे पाच ते सहा फूट पाणी आहे. सकाळी भोसले यांनी पोकलॅडमधून रस्त्याची चाचणी केली व पुराच्या पाण्याने फुटलेले दुभाजक बाजूला केले. वाहतुक सुरू करताना सुरवातीला पाण्याचा टँकर सोडण्यात येईल आणि त्यानंतर पाणी, पेट्रोल, डिझेल व दूध ही अत्यावश्यक सेवेतील वाहणे सोडण्यात येणार आहेत.

वाहतूक सर्वप्रथम एकेरी सुरू होईल. कोल्हापूरहून पुणेच्या दिशेने जाणार्‍या मार्गावर अजून तीन साडेतीन फूट पाणी आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यासाठी वेळ लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Gokul election 2026 Arun Dongale
Kolhapur Ganeshotsav
Kagal Peth Naka Highway
UPI MDR Rule
Marathi News Esakal
www.esakal.com